राजापूर : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून डोंगर येथील प्राैढाला चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान डोंगर गावी घडली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणाीत सज्जाद अब्दुल रेहमान मस्तान (४७) हे जखमी झाल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सज्जाद रेहमान मस्तान (रा. डोंगर मुसलमानवाडी, सध्या रा. जकात नाका, राजापूर) यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अकबर फकीर साखरकर, मुकद्दर इब्राहिम साखरकर, ईजाज आसफ साखरकर, मलिक रज्जाक साखरकर (सर्व रा. डोंगर मुसलमानवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २१ मे रोजी सज्जाद मस्तान हे दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान डोंगर स्टॉप येथे आपले मित्र अमजद साखरकर यांच्याशी बोलत हाेते. त्यावेळी या चाैघांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मस्तान यांना शिवीगाळ व दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हाताच्या ठोशाने मारून अंगावरील कपडे ओरबाडत अकबर फकीर साखरकर याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने मारहाण केली़. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्टेबल जाधव करत आहेत.