शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

प्रसाद लाड यांची गांधीगिरी, कमी भरपाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 4:24 PM

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली.

ठळक मुद्देप्रसाद लाड यांची गांधीगिरी, कमी भरपाईचा निषेधसरकारला दिले सुपारीचे रोप अन् ३०० रूपये

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याने लाड यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही रोपे सादर केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदनही सादर करण्यात आले.निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण नष्ट झालेल्या सुपारी झाडाला ५० आणि नारळ झाडाला २५० रुपये प्रतिझाड अशी विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला, ही क्रूर थट्टा आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या कोकणवासियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप लाड यांनी केला.

दिलेली ही झाडे मातोश्रीच्या अंगणात मुख्यमंत्र्यांनी लावावी. त्यांची जोपासना करावी आणि किती खर्च येतो ते पाहावे, असा खोचक संदेशही लाड यांनी यावेळी दिला. गणेशोत्सवासंदर्भात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबद्दल अद्याप कुठलाच निर्णय होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.शासनालाच दिले अनुदानलाड यांनी नारळाची भरपाई २५० रूपये तसेच सुपारीचे ५० रूपये अशी दोन पाकिटे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे देत शासनाच्या अनुदानाची खिल्ली उडवली. 

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी