शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
3
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
4
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
5
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
6
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
7
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
8
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
9
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
10
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
11
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
12
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
13
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
14
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
15
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
16
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
17
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
18
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
19
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
20
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

चिपळूणला २० वर्षांनंतर मिळालं नाट्य केंद्र, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ पासून

By संदीप बांद्रे | Published: November 18, 2023 1:55 PM

संदीप बांद्रे चिपळूण : काही कारणांमुळे चिपळूणला कोकणातील नाट्य केंद्र म्हणून असलेली ओळख गमवावी लागली होती. पुन्हा २० वर्षांनंतर ...

संदीप बांद्रेचिपळूण : काही कारणांमुळे चिपळूणला कोकणातील नाट्य केंद्र म्हणून असलेली ओळख गमवावी लागली होती. पुन्हा २० वर्षांनंतर चिपळुणात राज्य नाट्य स्पर्धा आयाेजित करण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपासून ही ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सुरू होणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत दरराेज सायंकाळी सात वाजता या स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण हाेणार आहे.चिपळुणात पूर्वी अनेक एकांकिका स्पर्धा होत हाेत्या. जवळपास २० वर्षांपूर्वी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे केंद्रही या ठिकाणी होत. तेच नाट्य केंद्र दुर्दैवाने तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने म्हणावे तसे सहकार्य न केल्याने गमवावे लागले होते. त्यानंतर सलग वीस वर्षे रत्नागिरीत राज्य नाट्य स्पर्धा हाेऊ लागल्या. यावर्षी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे यावर्षी चिपळूण येथे राज्य नाट्य स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. पूर्वी राज्य नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबईमध्ये आयाेजित केले जात हाेते. पहिल्यांदाच ते मुंबई बाहेर चिपळूणमध्ये झाले होतं, हाही एक इतिहास चिपळूणला आहे.

  • २५ राेजी - अशुद्ध बीजापोटी (काेतवडे पंचक्राेशी, माजी विद्यार्थी संघ काेतवडे, रत्नागिरी)
  • २६ राेजी - कोमल गंधार (कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी)
  • २७ राेजी - परीघ (कै. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण)
  • २८ राेजी - दॅट नाईट (राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी)
  • २९ राेजी - लॉलीपॉप (सहयाेग, रत्नागिरी)
  • ३० राेजी - वाटेला सोबत हवी (संकल्प कलामंच, रत्नागिरी)
  • १ डिसेंबर - फूर्वझ (श्रीदेव गाेपाळकृष्ण प्रासादिक कलामंडळ, जानशी, राजापूर)
  • २ राेजी - सात-बारा (श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्थ संस्था, रत्नागिरी)
  • ३ राेजी - तथास्तु (श्रीरंग, रत्नागिरी)

राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने दर्जेदार नाटके चिपळूणवासीयांना पाहायला मिळणार आहेत. चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे. इथले सर्वच सांस्कृतिक, नाट्य असे उपक्रम यशस्वी होतात, हे चिपळूणवासीयांनी दाखवून द्यायला हवेत. शिवाय हे केंद्र या ठिकाणी टिकवून ठेवणे, भविष्यातही या ठिकाणी नामवंत संस्थांच्या एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा व्हाव्यात, यासाठी नगर परिषद प्रशासनासह रंगकर्मी, नागरिक या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. - प्रसाद ऊर्फ भाऊ कार्ले, नाट्य कलाकार, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी