गणपतीपुळे : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला.यावेळी या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे उपस्थित अधिकाऱ्यांना नेहमीच्या एसटीच्या फेऱ्या या गणपतीपुळे एसटी स्थानकातूनच सोडण्यात येतात मात्र वस्तीसाठी आलेल्या गाड्या तसेच रात्री सोलापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, सातारा, कऱ्हाड आदी घाटमाथ्यावर भाविकांना घेऊन येणाऱ्या गाड्या एसटी स्टॅण्ड परिसरात भाविकांना सोडल्यानंतर येथील हॉटेल कृष्णा सि. व्ह्यू यांच्या समोरील पार्किंगमध्ये पार्किंग करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले.गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात होणारी भाविकांची गर्दी पाहता व सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना शारीरिक समस्या निर्माण झाल्यास उदा. ताप, सर्दी, प्रेशर, फिट येणे आदीसाठी मालगुंड प्राथमिक अरोग्य केंद्राची टिम १६ सप्टेंबरपासून मंदिर परिसरात कार्यरत राहणार आहे.महावितरण शाखा जाकादेवी, मालगुंड यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांना १६, १७ या दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत विद्युतपुरवठा खंडीत न करता गर्दीच्या ठिकाणी चोख विजेची व्यवस्था ठेवण्यात यावी, तसेच लाईनमन अधिकारी यांनी या दिवसांत चांगली कामगिरी करावी, असे सांगण्यात आले.
अंगारकीनिमित्त गणपतीपुळेत जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:56 PM
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला.
ठळक मुद्देअंगारकीनिमित्त गणपतीपुळेत जय्यत तयारीशासकीय विभागाला सतर्क राहण्याचा आदेश