शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जिल्हा पर्यटन महोत्सवाची तयारी जोरात सुरु

By admin | Published: April 27, 2016 9:41 PM

विविध कार्यक्रम : चिपळुणातील पवन तलावनजीक रंगणार कार्यक्रम

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने घेण्यात येणारा रत्नागिरी पर्यटन महोत्सव यावर्षी चिपळूण शहरातील पवन तलाव येथे ७ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाची तयारी अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली आहे. दि. ८ मे रोजी सकाळी ७ वाजता अ‍ॅरो मॉडेलिंग, ९ वाजता कराटे प्रात्यक्षिक व आरोग्य शिबिर, दुपारी ३ वाजता पाककला स्पर्धा, ४ वाजता प्रसिध्द शेफमार्फत मार्गदर्शन, ५ वाजता कृषी पर्यटन या विषयावर चंद्रशेखर भडसावळे, संजीव अणेराव यांचा परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक लोककला, सायंकाळी ७ वाजता मुंबई युनिट विद्यापीठाचे महाराष्ट्र महोत्सव, कोकणी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा हा कार्यक्रम होईल. दि. ९ मे रोजी ९ वाजता कोवॅस जिम्नॅस्टिक, कोवॅस व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रदर्शन, ९.३० वाजता डॉग शो, दुपारी ३ वाजता पुष्परचना स्पर्धा, ४ वाजता आदरातिथ्य व्यवस्थापन व्याख्यान, ५ वाजता नितीन बानुगडे पाटील यांचे शिवचरित्र, सायंकाळी ६ वाजता सांगता समारंभ, सायंकाळी ७ वाजता सुदेश भोसले यांचा संगीत गौरव कार्यक्रम होईल. याशिवाय दररोज सकाळी ८ वाजता पर्यटन सहल, पक्षी निरीक्षण, आमराई सफर, ९ वाजता आरोग्य शिबिर, ९.३० वाजता वॉटर स्पोर्ट्स, रिव्हर क्रॉसिंग, कयाकिंग जेटस्की, बंपर राईड, बनाना राईड, स्कुबा डायव्हिंग, रॉक क्लायंबिंग, बर्मा ब्रिज, आर्चरीज, रायफल शूटिंग, झिपलाईन, रिव्हर क्रॉसिंग, वॉटर झॉर्बिंग, क्रोकोडाईल सफारी असे कार्यक्रम दररोज होणार आहेत. भविष्यातील कोकणातील पर्यटन विषयावर चर्चासत्र, प्रसिध्द शेफमार्फत विविध पदार्थ तयार करणे व त्यांची आकर्षक मांडणी, हॉस्पिटॅलिटी तसेच आरक्षित सागरी पर्यटन आदी विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. प्राचीन कोकण, कला दालन, फोटोग्राफी प्रदर्शन, खाद्य दालन, आंबा व कृषी प्रदर्शन, सिने कलाकारांचा कॉमेडी शो, रुपेरी पडद्यावरील गायकांची गाणी, पारंपरिक कला व नृत्याविष्कार, पालखी नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडणार आहे. (प्रतिनिधी)स्थानिक लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत प्रकाश सावंत, आरती गोडसे व कांता कानिटकर काम पाहणार आहेत. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस हेमंत वळंजु, राजा पाथरे, स्टॉल बुकिंग संस्था व बचत गट याचे काम कृषी विभागाचे मनोज गांधी, रमण डांगे हे पाहतील. रांगोळी, पाककला, पुष्परचना स्पर्धेचे प्रमुख म्हणून भूमिअभिलेखच्या उपअधिक्षक सुप्रिया शिंत्रे व रिहाना बिजले काम पाहतील. शोभा यात्रेचे नियोजन तहसीलदार वृषाली पाटील व बापू काणे काम पाहणार आहेत. तरी यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी केले आहे.