शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
IND vs NZ: "तो 'टॅलेंटेड' आहे म्हणून टीम इंडियात खेळतोय"; रोहित शर्माचा 'या' खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव
3
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
4
सलमानच्या जीवाला धोका, विवेक ओबेरॉयने केलेली त्याच 'बिश्नोई' समाजाची स्तुती; Video व्हायरल
5
बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त
6
खळबळजनक! Kylian Mbappe वर बलात्काराचा आरोप; स्टार फुटबॉलरनं अशी दिली प्रतिक्रिया
7
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
8
Salman Khan : गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
9
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
10
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
11
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
12
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
13
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
14
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
15
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
16
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
17
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
18
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
19
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
20
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Rain: चिपळुणात महामार्गच बनला तलाव!, वाहतूक ठप्प; पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 3:42 PM

मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे जोरदार फटका बसला

चिपळूण : शहरासह तालुक्यात आज, सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने चक्क महामार्गावरच तलाव निर्माण झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून उपसा केलेला गाळ शहरातील जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे जोरदार फटका बसला. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात चक्क तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने महामार्गावरच तलाव निर्माण झाला आहे. अरुंद मोऱ्या टाकल्याने ओझरवाडी येथील डोंगराचे वाहून येणारे पाणी अडते. त्यामुळे याठिकाणी रुंद मोऱ्या उभारण्याची मागणी केली जात होती.तसेच चौपदरीकरणा अंतर्गत दोन्ही बाजूंनी गटारे उभारली असली तरी परिसरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्याचा फटका दरवर्षी बसत असल्याने येथील नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषदेला वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु याबाबत कोणतीही दखल घेतली न गेल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पावसात जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकलेल्या भरावामुळे मंदिर ते जिप्सी कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे हाही मार्ग बंद पडला आहे.दरड कोसळल्याची घटनामुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी छोटे-मोठे दगड रस्ता आल्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा घाटात तैनात करण्यात आली आहे. तसेच घाटातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसChiplunचिपळुण