शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:24 PM

SureshPrabhu dapoli Ratnagiri : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

ठळक मुद्देविकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभूकोकणचा शाश्वत विकास परिसंवादाला प्रतिसाद

दापोली : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोकणचा शाश्वत विकास या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, गद्रे मरिन्सचे दीपक गद्रे, प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन, उद्योजक जयंत देसाई, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, डॉ. प्रकाश शिंगारे सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, अभ्यासक डॉ. दीपक आपटे, डॉ. उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे मिहीर महाजन, दीपक महाजन यांनी संयोजन केले. ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते. व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे, संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया, असे प्रभू म्हणाले.कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ संजय सावंत म्हणाले की,नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवले पाहिजे. कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे. चाकरमानी माणसांना गावाशी जोडून ठेवले पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून पिके घेतली पाहिजे, असे सांगितले. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरी