शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जेल भरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:14 PM

राजापूर : जनहक्क सेवा समितीने सोमवारी जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पुकारलेल्या जेल भरो आंदोलनात आमदार राजन साळवी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शिवसैनिकांसह शेकडो ग्रामस्थांना पोलिसांनी अटक करून सुटका करण्यात आली.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात गेली १२ वर्षे हा लढा सुरूआहे. शिवसेनेसह ग्रामस्थांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे अणुऊर्जा प्रकल्प रेंगाळला आहे. प्रकल्पाच्या विरोधात सातत्याने ...

राजापूर : जनहक्क सेवा समितीने सोमवारी जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पुकारलेल्या जेल भरो आंदोलनात आमदार राजन साळवी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शिवसैनिकांसह शेकडो ग्रामस्थांना पोलिसांनी अटक करून सुटका करण्यात आली.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात गेली १२ वर्षे हा लढा सुरूआहे. शिवसेनेसह ग्रामस्थांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे अणुऊर्जा प्रकल्प रेंगाळला आहे. प्रकल्पाच्या विरोधात सातत्याने शिवसेनेने शेतकरी आणि मच्छिमारांसह आंदोलने छेडली. आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जनहक्क सेवा समिती आंदोलन छेडले आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे कागदावर करार होत असले तरी प्रकल्पस्थळी हा प्रकल्प रेटून नेण्यात पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजप सरकारला अपयश आले आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात असलेला हा लढा कायम सुरू राहावा या उद्देशानेच सोमवारी जेल भरो आंदोलन छेडण्यात आले असल्याची भूमिका मांडण्यात आली.अणुऊर्जा प्रकल्पस्थळी सोनार गडगा या भागात जनहक्क सेवा समितीने जेल भरो आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनामुळे परिसरात कलम १४४ अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तबरेज चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झाली.अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन कोठेही असले तरी प्रत्येक आंदोलनात शिवसेना ग्रामस्थांसोबत असेल, अशी ग्वाही आमदार राजन साळवी यांनी दिली. यावेळी जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मन्सूर सोलकर, अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर यांचीही भाषणे झाली.त्यानंतर पोलिसांनी आमदार राजन साळवी, जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मन्सूर सोलकर, अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर, राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती अभिजित तेली, उपसभापती प्रशांत गावकर, जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, शाखाप्रमुख मजीद गोवळकर, साखरी नाटे सरपंच नौशाद धालवेलकर, इरफान कोतवडकर, नदीम टमके, माडबन सरपंच मनीषा खडपे, जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर, राजन कोंडेकर, सचिन वाघधरे, बाळू साखरकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनामुळे नाटे बाजारपेठ अर्धवेळ बंद ठेवण्यात आली होती.शिवसेनेच्या सहभागावर नाराजी?या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे जनहक्क सेवा समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. समिती सर्व पक्षीयांची आहे. त्यामुळे हे कोणत्या एका पक्षाचे आंदोलन नसून सर्वांचे आंदोलन आहे. त्यामुळे कोणीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आंदोलनात यावे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सहभागाबाबत काहीजणांनी नाराजी व्यक्त केली.२0 बसेसमधून नेले आंदोलकआंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना तब्बल २0 एस्. टी. बस भरून नाटे येथील हायस्कूलमध्ये नेले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले.