असगोली : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळ, वरवेली तेलीवाडी आयोजित रत्नागिरी जिल्हा तेली ज्ञाती बांधव मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आणि त्याचे बक्षीस वितरणही करण्यात आले.
ही स्पर्धा माध्यमिक गट व खुला गट यामध्ये घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील एकूण ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
माध्यमिक गटात शुभ्रा सुनील रसाळ (नेवरे, ता. रत्नागिरी), भक्ती विश्वनाथ महाडिक (लोटे, ता. खेड), तन्वी विनायक झगडे (अडूर, ता. गुहागर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले. खुल्या गटात दिव्या गजानन महाडिक (कळबस्ते, ता. चिपळूण), प्रीतम लहू पवार (धोपावे, ता. गुहागर), अश्विनी अनिल किर्वे (वरवेली, ता. गुहागर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले. सन्मानपत्र व रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धेचे परीक्षक दीपक विचारे, संतोष देसाई, दशरथ किर्वे, प्रभाकर किर्वे, पत्रकार गणेश किर्वे, बळीराम पवार, दीपक किर्वे, संतोष किर्वे, नीलेश रसाळ, ग्रामपंचायत सदस्य दिव्या किर्वे, रश्मी किर्वे, रेश्मा रसाळ, गजानन महाडिक उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष किर्वे यांनी केले. या स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या आकाश किर्वे, श्रावणी रहाटे, सिद्धेश किर्वे, आदित्य किर्वे, जन्मेश किर्वे, स्नेहल पवार, रुचिता किर्वे, मनस्वी किर्वे, सुशांत रसाळ व इतर सहभागी स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण दीपक विचारे व अनिल अवेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष किर्वे यांनी केले.
.........................
फोटो आहे.
गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळ तेलीवाडीच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.