रत्नागिरी : दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातीलमहामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा अभियान सुरू करण्यात आले आहे. ७ डिसेंबरपासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरु केला आहे.कोकणामधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून, यावर गेल्या दहा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली वाहून कोकण हायवे समन्वय समितीच्या 'समृद्ध कोकण महामार्ग अभियान' या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून, कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पडतो तेवढाच पाऊस कोकण महामार्गावर पडतो. मग दरवर्षी कोकण महामार्गावर २ - ४ फुटाचे खड्डे कसे काय पडतात? सहा महिने खड्डे रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्ष चालणार? असा सवाल कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ह्यसमृद्ध कोकण महामार्ग अभियानह्ण चे प्रणेते संजय यादवराव यांनी केला.कामाचा दर्जा आणि कामाचा वेग चांगला राहण्यासाठी एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी कोकणवासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावे, असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे. यशवंत पंडित, अॅड. ओवेस पेचकर, विकास शेट्ये, विलास नाईक, अॅड. मंगेश नेने, संतोष ठाकूर, सुरेश म्हात्रे, नीलेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.पहिल्या टप्प्याची पाहणीपळस्पे ते पोलादपूर या पहिल्या टप्प्याची पाहणी आणि अभ्यास समिती सदस्यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी काम पूर्ण होईपर्यंत हा दबावगट कायम राहणार आहे.
चांगल्या महामार्गासाठी समृद्ध कोकण अभियान, समितीचा अभ्यासदौरा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 1:42 PM
highway, Konkan, pwd, Ratnagirinews दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा अभियान सुरू करण्यात आले आहे. ७ डिसेंबरपासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरु केला आहे.
ठळक मुद्देचांगल्या महामार्गासाठी समृद्ध कोकण अभियानकोकणवासियांच्या समितीचा अभ्यासदौरा सुरु