खेड : येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गुरूवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदासभाई कदम माफी मागा अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी सुवर्णा पत्की यांच्याविषयी विधानपरिषद सभागृहात केलेली शेरेबाजी ही समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारे असल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्ष उर्मिला शेटे-पाटणे यांनी सांगितले.दोन वर्षांच्या काळात अनेक गुन्ह्यांची उकल पत्की यांनी यशस्वीपणे केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले आहे. या दोन वर्षात कोणत्याही जातीय किंवा धार्मिक दंगलीची घटना घडली नाही. दोन्ही समाजांमध्ये अत्यंत चांगले संबंध निर्माण केले. तसेच कोविड कालावधीत उत्तम प्रकारे समाजकार्य करत लॉकडाऊन यशस्वी केला आहे. गरजवंताना जिन्नस वाटप केले. गेले १० महिने स्वतः एक महिला असताना स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी घेतली. अशा व्यक्तीचा खरे तर सन्मान व्हायला पाहिजे होता. परंतु, त्यांच्यावर शेरेबाजी केली गेली, हे दुर्दैवी असल्याचे मत या महिलांनी मांडले आहे.आमची सरकारला विनंती आहे. त्यांची अन्यायकारक बदली त्वरीत रद्द करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा या निवेदनात दिला आहे. शिवसेनेने केलेला विरोध आणि मनसेकडून पाठराखण यामुळे आता या विषयाला पक्षीय स्वरूप आले आहे.अश्लिल शेरेबाजीमाजी मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना अश्लिल भाषेत दुपारी आणि रात्री त्यांची अवस्था काय असते, अशी शेरेबाजी केली आहे. एक महिला म्हणून आम्ही अशा शेरेबाजीचा निषेध करतो, असे निदर्शन करणाऱ्या महिलांनी म्हटले आहे. सुवर्णा पत्की यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचे विशेष कौतुकही या महिलांनी केले आहे.माफी मागायला हवीया शेरेबाजीतून केलेले विधान रामदास कदम यांनी त्वरित मागे घेऊन महिला वर्गाची माफी मागावी, अशी मागणी मनसे महिला आघाडीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. खेडवासीय सर्व महिला उत्तम काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या आहोत, असेही या महिलांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.
पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 11:12 AM
Ramdas Kadam KhedPolice Ratnagiri- खेड येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गुरूवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदासभाई कदम माफी मागा अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी सुवर्णा पत्की यांच्याविषयी विधानपरिषद सभागृहात केलेली शेरेबाजी ही समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारे असल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्ष उर्मिला शेटे-पाटणे यांनी सांगितले.
ठळक मुद्देपोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीविरोधात निदर्शनेरामदासभाई माफी मागा, मनसेच्या महिलांनी केली घोषणाबाजी