खेड : सरकारकडून लॉकडाऊन झाल्यापासून सर्व नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत मे व जून २०२१ या दोन महिन्यासाठी अन्नधान्य देण्याची सुविधा देण्यात आली आहे; मात्र काही रेशन धान्य विक्रेते नागरिकांना धान्याचा पुरवठा करत नसून मोफत अन्नधान्यही देत नाहीत. या विक्रेत्यांची लवकरात लवकर तपासणी करून
नागरिकांना हक्काचे मोफत अन्नधान्य देण्यात
यावे, अशी मागणी रिपाइंचे कोकण प्रदेश
संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी केली आहे.
जे रास्तधान्य दुकानदार नागरिकांची फसवणूक करत आहेत त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे. हे अन्नधान्य गरजू लोकांपर्यंत न पोहोचवल्यास आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दिला आहे.