रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माळनाका शाखेच्या नवनिर्वाचित शाखा व्यवस्थापक सुविधा संतोष साळवी यांच्यातर्फे हेल्पिंग हॅन्डच्या माध्यमातून रत्नागिरीतील ठराविक कोविड विलगीकरण केंद्रात वयोवृद्ध रुग्णांसाठी कमोड खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.
सध्या विविध विलगीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिक उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी सुविधा संतोष साळवी यांच्यातर्फे हेल्पिंग हॅन्डच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील विविध विलगीकरण केंद्रांसाठी कमोड खुर्च्यां प्रदान करण्यात आल्या. शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथे या खुर्च्या रत्नागिरीचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. महेंद्र गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यांचे सहकारी लसीकरण सहनियंत्रक तुषार साळवी, कनिष्ठ सहाय्यक अमित कोरगावकर आणि आरोग्य पर्यवेक्षक कल्याण बिराजदार यांच्या ताब्यात खुर्च्या देऊन त्यांचे महिला रुग्णालय, बी. एड्. कॉलेज, गोगटे कॉलेज या विलगीकरण केंद्रांत वाटप करण्यात आले.
यावेळी हेल्पिंग हॅन्डचे सदस्य सचिन शिंदे, रुपेश सावंत, दीपेश साळवी, सुबहान तांबोळी, सिद्धेश धुळप, चेतन नवरंगे, मयुरेश मडके, आदी स्वयंसेवक उपस्थित होते.