खेड : मुंबई-गोवा मार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ किलोमीटर अंतरापैकी ३८ किलाेमीटरहून अधिक अंतरापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे़ मात्र, चौपदरीकरणाच्या कामाबाबत आतापासून साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. कळंबणीनजीकचे चौपदरीकरण दोन ठिकाणी उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण काम ठेकेदार कंपनीने युद्धपातळीवर हाती घेतले. ३८ किलाेमीटरच्या अंतरावरील चौपदरीकरणावरून वाहने धावत आहेत. मात्र, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयनजीकचे चौपदरीकरण उखडल्याचा प्रकार पुढे आला आहे. येथे चौपदरीकरण दोन ठिकाणी उखडल्याने दर्जाहीन कामाचा नमुना आपल्याला दिसून येत आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीक उखडलेल्या चौपदरीकरणामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चौपदरीकरणामुळे महामार्गावरील प्रवास वेगवान झाला असला, तरी चौपदरीकरण आतापासूनच उखडू लागल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून दिवस-रात्र शेकडो वाहने धावत असतात. या उखडलेल्या चौपदरीकरणामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसात या खड्ड्याचा विस्तार आणखीन वाढतच जाणार आहे. ----------------------------------
खेड तालुक्यातील कळंबणीनजीक केलेले चौपदरीकरण उखडल्याने वाहनचालकांचे हाल हाेत आहे़त.