रत्नागिरी : पाण्याच्या वादातून सासऱ्याने सुनेला शिविगाळ करीत थापटाने मारहाण केली तर सासूने सुनेला रबराच्या पाईपने जबर मारहाण केली. याप्रकरणी गौरी योगेश चव्हाण (३०, रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र जयराम चव्हाण व शुभांगी हरिश्चंद्र चव्हाण (दोघे रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १० जून रोजी हा प्रकार घडला.फिर्यादी गौरी चव्हाण यांच्या राहत्या घरात ३ दिवसांपासून पाणी आलेले नव्हते. त्यामुळे गौरी चव्हाण यांनी पतीसह नदीच्या पलिकडे देवपाटवाडी येथे जाऊन पाणी आणले. त्यानंतर पतीने घरातील आई-वडिलांच्या खोलीतील भांड्यामध्ये पाणी ओतले. त्यावेळी फिर्यादी गौरी चव्हाण यांनी आपण आधी वरती पाणी भरून घेऊया, असे पतीला सांगितले. त्याचा राग येऊन सासरे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सुनेला शिविगाळ केली.त्यानंतर सासू शुभांगी यांनी रबरी पाईपने सुनेच्या पायावर, मांडीवर, पाठीवर, डोळ्यावर, दोन्ही हाताच्या दंडांवर जबर मारहाण केली. सासऱ्याने थापटाने मारहाण केली, असे गौरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३२४, २३२, ५०४, ३४ अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
पाण्याच्या वादातून सुनेला रबरी पाईपने बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 6:40 PM
पाण्याच्या वादातून सासऱ्याने सुनेला शिविगाळ करीत थापटाने मारहाण केली तर सासूने सुनेला रबराच्या पाईपने जबर मारहाण केली. याप्रकरणी गौरी योगेश चव्हाण (३०, रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र जयराम चव्हाण व शुभांगी हरिश्चंद्र चव्हाण (दोघे रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १० जून रोजी हा प्रकार घडला.
ठळक मुद्देपाण्याच्या वादातून सुनेला रबरी पाईपने बेदम मारहाणसासरे, सासूविरोधात गुन्हा दाखल