रत्नागिरी : वाढदिवसानिमित्त व्हॉटस्ॲपवर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना रत्नागिरीत तालुक्यातील चिंचखरी येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात सोमवारी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचखरी - पहिलीवाडी या मार्गावर रविवारी ही घटना घडली. वाढदिवसानिमित्त व्हॉटस्ॲपवर स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यावरून दोन गट एकमेकांसमोर भिडले. लाकडी रिपेने डोक्यावर व शरिरावर जोरदार फटके मारण्यात आले. त्यामध्ये दीपक सुभाष बोरकर हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी उमेश जनार्दन बोरकर आणि प्रवीण चंद्रकांत भाटकर यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रामीण पोलीस स्थानकात प्रवीण चंद्रकांत भाटकर, स्वप्नील संजय बोरकर, राजकुमार रमेश सुर्वे, ओंकार वीरेंद्र भाटकर, सोहम जयेंद्र भाटकर, राजेंद्र, कृष्णा भाटकर (सर्व रा. पहिलीवाडी, चिंचखरी) तर दुसऱ्या गटातील दीपक सुभाष बोरकर, विशाल जनार्दन बोरकर, उमेश जनार्दन बोरकर, संजय विजय बोरकर, सप्तमेश विजय बोरकर, गिरीश सत्यवान बोरकर यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.ग्रामीण पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग तसेच मारहाण प्रकरणी भारतीय दंड विधान कलम १४३,१४७, १४८, १४९, ३२४,५०४, ५०६, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉटस्ॲपच्या स्टेटसवरून दोन गटात राडा, रत्नागिरीतील चिंचखरीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 7:22 PM
whats up, crimenews, ratnagiri, police वाढदिवसानिमित्त व्हॉटस्ॲपवर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना रत्नागिरीत तालुक्यातील चिंचखरी येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात सोमवारी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देव्हॉटस्ॲपच्या स्टेटसवरून दोन गटात राडा, रत्नागिरीतील चिंचखरीतील प्रकारपरस्परविरोधी तक्रारी दाखल, अकरा जणांना अटक