ठळक मुद्देरेल्वे दुपदरीकरणाचे काम २०२०पर्यंत : संजय गुप्तारेल्वे मार्गावर कोकण रेल्वेतर्फे ८ नवीन स्थानके
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गाच्या रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण डिसेंबर २०२९पर्यंत, तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी चिपळुणात दिली.यावेळी गुप्ता म्हणाले की, कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. दरवर्षी टप्प्याटप्प्याने सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.
या रेल्वे मार्गावर ८ नवीन स्थानके बांधण्यात येत आहेत. सापे - वामनेसारख्या थांब्याचे प्लॅग स्टेशन्स रुपांतर स्थानकांमध्ये करण्यात येत आहे. गोरेगाव व इंदापूर स्थानकांचे काम प्रगतीपथावरआहे.