रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. कधी उकाडा, तर कधी गारवा असे वातावरण बदलू लागले आहे. या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून आजारपण वाढले आहे.गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मध्येच मळभाचे वातावरण असल्याने उकाड्यात अधिक भर पडत आहे. सध्या रत्नागिरीचे वातावरण ३५ ते ३६ अंशावर पोहोचू लागले आहे. उकाडा वाढल्याने अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.कुलाबा येथील हवामान खात्याच्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.बागायतदारांना धास्तीयाआधीच गतवर्षी सतत बदलत्या राहिलेल्या हवामानामुळे आंबा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यंदा आंब्याचे प्रमाण कमी आहे. उशिराच्या थंडीमुळे अजूनही आंबा तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्यातही नुकसान झाले आहे. आता परत पाऊस आला तर एप्रिलमध्ये हातात येऊ शकणारे फळही हातचे जाण्याची भीती आहे.
रत्नागिरीत २१, २२ रोजी विजांसह पाऊस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:03 PM
Rain Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
ठळक मुद्देरत्नागिरीत २१, २२ रोजी विजांसह पाऊस?बागायतदारांना धास्ती