शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पैशाचा पाऊस; आणखी चौघे अटकेत

By admin | Published: June 05, 2016 10:38 PM

मंडणगडमधील प्रकार : आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यता

मंडणगड : तालुक्यातील सुर्ले येथे खळबळ उडून देणाऱ्या २५ लाखांच्या पैशाचा पाऊस प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. गेले सहा दिवस पोलिसांचे पथक राज्यातील विविध ठिकाणी या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर याप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. फसवूणक करून लाटण्यात आलेल्या मुद्देमालांपैकी काही रक्कमही पोलिसांच्या हाती लागली आहे. या सर्वांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात जिल्ह्यातील अन्य काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.पैशाचा पाऊस प्रकरणात मुख्य सूत्रधार राजू मारुती पवार (वय ३५, रा. देसगाव, कळवण, जि. नाशिक) याच्यासह मगन रमझोड पवार (३८, जामेद, पो. टिटाणे, ता. साखरी, जि. धुळे) यांना २७ मे २०१६ रोजी लोणावळा येथून यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, राज्यातील विविध ठिकाणी तपास करून आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अतुल शंकर मुणगेकर (३६, ऐरोली, नवी मुंबई) याला मुंबई येथे ताब्यात घेण्यात आले. पंडित ऊर्फ बंटी गंगारा भोये (२४, बोरगाव, ता. सुरगाणा, जि. नाशिक), सुजित अशोक लांमगे (३५, शेंडी ता. अकोले, जि. अहमदनगर), राजेंद्र अकनात बनसोडे (३५, शेंडी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. त्यांना शनिवारी अटक करून प्रथम मंडणगड येथे आणण्यात आले. त्यानंतर दापोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सहाजणांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ५०६-३४ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व्याप्ती व प्रारंभ व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग झोरे, सुरेंद्र सावंत, कमलाकर चौरे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत, अशोक चव्हाण, कोलापट्टे यांनी यशस्वी तपास केला.फसवणुकीचा काही मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात सापडल्याने तपासकामाला वेग आला आहे. या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)सुर्ले या गावी जेथे प्रत्यक्षपणे फसवणुकीचे गुन्ह्याला मूर्त स्वरूप देण्यात आले, त्या घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेले सहा आरोपी नेमके कसे पोहोचले? त्यांना या ठिकाणाची माहिती कोणी दिली? आरोपींना येथे आणणाऱ्यांचा या गुन्ह्याशी संबंध होता का? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.आणखी चौघे ताब्यात?मंडणगड पोलिसांनी याप्रकरणी आणखी चौघांच्या मुसक्या आवळल्याचे वृत्त आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.हव्यासापोटी अनेकजण पैसे दुप्पट करण्याच्या प्रकाराला बळी पडत आहेत. उच्चवर्गीय लोकांचा यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, फसवणूक झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने लोक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या टोळींचे फावते आणि अशा कृत्यांना बळकटी मिळते. त्यांना शिक्षा मिळण्यासाठी फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार द्यावी.- प्रदीप मिसर, पोलिस निरीक्षक, मंडणगड