राजापूर : कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होताच राजापूर एस. टी. आगारातून लांबपल्ल्याच्या सर्व फेऱ्या नियमित सुरू करण्यात आल्या आहेत. यात बोरिवली, मुंबई, कोल्हापूर, पुणे मार्गावरील फेऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. हे निर्बंध सोमवारपासून शिथील झाले. त्यामुळे राजापूर एस. टी. आगारातून पूर्वीप्रमाणे लांबपल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली. राजापूर-बोरिवली दुपारी ४.३० वाजता, राजापूर-सांगली दुपारी १२.३० वाजता, राजापूर-तुळजापूर सकाळी ७.४५ वाजता, राजापूर-स्वारगेट सकाळी ६.३० वाजता, राजापूर-लातूर दुपारी २.४५ वाजता, राजापूर-अर्नाळा सकाळी ८ वाजता, राजापूर-बोरिवली सकाळी ९ वाजता, राजापूर-कोल्हापूर सकाळी ८ वाजता या लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
राजापूर-येरडव-मुंबई ही गाडीही सुरू करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता येरडववरुन ती मार्गस्थ होणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन पाथरे यांनी केले आहे.