शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

विलाेभनीय धबधब्यांचा राजापूर तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 12:48 PM

अखेरच्या आठवड्यात सुरुवात करूनही नंतर त्याने विश्रांती घेतली. मात्र, आता तो मुसळधार कोसळतोय.

- विनोद पवार

पाऊस मुसळधार असला तरी कोकणात फिरायचं तर पावसाळ्यातच. हिरव्यागार कोकणातल्या हिरव्या हिरव्या डोंगरांच्या अंगाखांद्यावर धावणारं फेसाळतं पाणी जागोजागी दिसतं आणि ते पाहणारा त्यात हरवून जातो. यंदा हे सुख मिळणार की नाही, अशी स्थिती जूनमध्ये वाटत होती. खरं तर जून महिन्यातच धबधबे प्रवाहित होतात आणि स्थानिकांसह पर्यटकांची पावलेही धबधब्यांकडे वळतात; पण जवळजवळ सगळाच जून कोरडा गेला. अखेरच्या आठवड्यात सुरुवात करूनही नंतर त्याने विश्रांती घेतली. मात्र, आता तो मुसळधार कोसळतोय. अगदी मुक्तपणे त्यामुळे डोंगर हिरवेगाव झाले आहेत आणि त्यांच्या अंगाखांद्यावर धबधबे धावू लागले आहेत. राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असे धबधबे दिसू लागले आहेत.धुतपापेश्वर धबधबा

तालुक्यातील शंकराचे जागृत स्थान असलेल्या धुतपापेश्वर मंदिरानजीक वाहणाऱ्या मृडानी नदीचा मोठा प्रवाह खाली नदीपात्रात पडतो. ते दृश्य नयनरम्य असते. परिसरातील शांततेला लयबद्ध आवाजाची साथ देत नदीपात्रात कोसळणारा पाण्याचा प्रवाह मन मोहवून टाकतो. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येणारे बरेच भाविक देवदर्शनानंतर या  धबधब्याचा आनंद घेतात.ठिकाण : राजापूर शहरापासून केवळ दाेन किलोमीटरकसे जाल : राजापूर जवाहर चौकातून रिक्षा मिळतात.

हर्डीचा कातळकडा

राजापूर शहरापासून चार किमीवर हर्डी येथील कातळकडा  धबधबाही प्रवाहित झाला आहे. येथे हौशी पर्यटक स्नानासाठी जातात. हा धबधबा अतिशय सुरक्षित असून याठिकाणी जाण्यासाठीही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. राजापूर धारतळे मार्गावर हर्डी गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. थोडेसे खाली चालत गेले की उंचावरून पडणारा पाण्याचा प्रपात अनुभवता येतो. सुरक्षित असल्यामुळे या धबधब्याखाली मनसोक्त भिजता येते. त्यामुळे येते पर्यटकांची जास्त पसंती असते.  ठिकाण : राजापूर शहरापासून केवळ चार किलोमीटरकसे जाल : खासगी वाहनसौंदळचा ओझरकडा

तालुक्याच्या मध्य- पूर्व परिसरात सौंदळ येथे बारेवाडीतील असलेल्या डोंगर कपारीतील  धबधब्याचे  दूरवर असलेल्या ओणी- अणुस्कुरा या मार्गावरून  दर्शन होते. ओणी- अणुस्कुरा मार्गावर सौंदळमधून त्या धबधब्याकडे पायवाटेने जाताना जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतात. पुढे गेल्यावर उंचावरून मोठ्या आवाजात खाली कोसळणारा पाण्याचा प्रवाह आपोआपच खेचून घेतो. इथे त्या मानाने पर्यटकांची वर्दळ कमी आहे.ठिकाण : मुंबई- गोवा महामार्गावरील ओणी या गावापासून सुमारे १० किमी अंतरावर सौंदळ या गावाजवळ हा धबधबा आहे.कसे जाल : राजापूरमधून सौंदळपर्यंत एस.टी. बस, खासगी गाडीने जाता येते.चुनाकोळवणचा सवतकडा

मुंबई- गोवा महामार्गावर तिवंदामाळ (ता. राजापूर) येथून चुनाकोळवणच्या सवतकडा धबधब्याकडे रस्ता जातो. तेथून पाच कि.मी. अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे वरच्या बाजूला गाडी लावून थोडेसे खाली निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा लागतो. अतिशय भान हरपून टाकणारा हा प्रपात खिळवून ठेवतो आणि सारं काही विसरायला लावतो. मंदरूळ, वाटुळ, चुनाकोळवण परिसरात रांगोळीचा दगड मोठ्या प्रमाणात आहे. स्लेट टाइप दगडामुळे, दगडाचे वेगवेगळे टप्पे तयार होतात, त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असे वाटावे असे अद्भूत सौंदर्य याठिकाणी आहे. हा संपूर्ण भाग डोंगर- दऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर तीन-चार ठिकाणी छोटे- मोठे धबधबे आढळतात. मागील दहा- बारा  वर्षात या धबधब्यावर पर्यटकांचा ओढा वाढत असून अगदी पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणांवरून पर्यटक स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येतात. म्हणूनच हा धबधबा सर्वांचे खास आकर्षण आहे.ठिकाण : राजापूर शहरापासून २० किलोमीटरकसे जाल : चुनाकोळवणपर्यंत एस.टी. बस, खासगी गाडीने जाता येते.कोंढेतडचा जितावणे धबधबामुंबई- गोवा महामार्गावर कोंढेतड परिसरात वाहणारा जितावणे धबधबा पर्यटकांसह प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो. महामार्गाच्या लगतच गंगातिठ्याजवळ हा धबधबा आहे. अतिशय सुरक्षित आणि राजापूर शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा धबधबा अनेकांचे लक्ष वेधून घेतो.ठिकाण : राजापूरपासून एक किलोमीटरवर.कसे जाल : खासगी वाहन, रिक्षाकाजिर्डा पडसाळी धबधबाराजापूर तालुक्याच्या जामदाखोरे परिसरातील काजिर्डा गावातील धबधबा सर्वात मोठा आहे. काजिर्डा गावात प्रवेश केला की लांबून त्याचे दर्शन होते. विशेष म्हणजे, हा धबधबा मार्च, एप्रिलपर्यंत प्रवाहित असतो. अगदी मे महिन्यातही त्याचा क्षीण झालेला प्रवाह पाहावयास मिळतो. या धबधब्याच्या पाण्यावर काजिर्डा परिसरातील लोक उन्हाळी पिके घेतात. लगतच वाहणाऱ्या जामदा नदीमध्ये त्याचा प्रवाह पुढे सरकतो. मात्र, या धबधब्याकडे जाताना खूप पायपीट करावी लागते.ठिकाण : राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.कसे जाल : काजिर्डा गावापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस आहेत. तेथून पायी जावे लागले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन