संजय सुर्वेशिरगाव : सत्ययुग, द्वापार युग आणि इंद्रगुप्त मोर्य यांच्या पासून अभ्यास करता 1500 वर्षापासून महाराष्ट्रात संघराज्य स्थापन करणारे राजे चंद्रराव मोरे घराणे आहे. त्यांचा सत्ताप्रवास, धर्मनिष्ठ कार्य, त्या काळातील राजकीय व भौगोलिक स्थितीमुळे कुणाला समजला नाही. स्वराज्य संकलपनेच्या संक्रमणाचा काळात आदिलशाहने चंद्रराव किताब व मोरचेल धारण करण्यास मान्यता दिली ही चुकीची माहिती आहे. राजे चंद्रराव स्वराज्य द्रोही नव्हते अशी माहिती अनेक दाखले देत इतिहास अभ्यासक शिल्पा प्रधान -परब यांनी दिली.पनवेल येथे झालेल्या पहिल्या जावली मोरे परिवार संमेलनात त्यांनी दोन तास केवळ स्वराज्य संक्रमण काळ व मोरे परिवार यावर विवेचन केले. स्वतः छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना झाल्यानंतर अनेक धुरंदर मोरेंचा गौरव केला आहे, याबाबत माहिती दिली. ठाणे पालघर सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून सहाशे मोरे मंडळीच्या उपस्थितीत गोवंश संरक्षक निखिल मोरे, शिक्षण कोमल मोरे, धनश्री मोरे, वीरनारी कमलाबाई मोरे, प्रशासकीय सेवा सुरेश मोरे, प्रकाश मोरे, वसंत मोरे, संदीप मोरे , ऋचा मोरे मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रकाश मोरे, सुभाष मोरे यांचा मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले.मोरे घराण्याचा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित झाल्यावर अनेक वर्षाचे गैरसमज दूर होऊन नव्या पिढीला दिशादायी कार्य दिसेल, असा आशावाद संस्था सचिव विनोद मोरे यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केला.
खोटा इतिहास समोर आणल्याची किंमत राजे चंद्रराव मोरे कुळवंशीयांना भोगावी लागली : शिल्पा प्रधान-परब
By संदीप बांद्रे | Published: January 17, 2024 4:57 PM