अडरे : लोटे परशुराम येथील विनती ऑर्गेनिक कंपनीचे व्यवस्थापक राजीव जांभेकर व साइट इन्चार्ज शशिकांत महिमान यांनी लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराच्या संग्रहालय व कलादालनाला भेट दिली.
यावेळी बोलताना राजीव जांभेकर यांनी ग्रंथालय व कलादालनाचे कौतुक केले. ग्रंथालयाने कोकणातील विद्यार्थी व अभ्यासकांना पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले. शशिकांत महिमान यांनी वाचनालय व कोकणचा गौरवशाली इतिहास या माध्यमातून दाखवत असल्याचे सांगून ७५ हजार ग्रंथसंख्या असलेले ग्रंथालय व त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लोटिस्माच्या वतीने अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.