शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राज्यराणी, जनशताब्दीला जादा डबे द्या

By admin | Published: March 18, 2015 10:23 PM

सुरेश प्रभू यांचे आदेश : विनायक राऊत यांची मंत्र्यांकडे मागणी

कुडाळ : कोकण रेल्वेच्या मार्गावरील राज्यराणी व जनशताब्दी या दोन महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनातून केली. या दोन्ही गाड्यांना तत्काळ जादा डबे जोडण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राज्यराणी व जनशताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या कोकणातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र, या दोन्ही गाड्यांना कमी डबे असल्याने जास्तीत जास्त लोकांना या गाडीमधून प्रवास करता येत नव्हता. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या, वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता राज्यराणी व जनशताब्दीला जादा डबे जोडण्याची मागणी कोकणवासीय अनेक वर्षे करीत आहेत. ही मागणी आता पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)सुरेश प्रभू यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनाकोकणवासीयांच्या या मागणीचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केला. यासंदर्भात खासदार राऊत यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना निवेदन दिले होते. कोकणवासीयांसाठी महत्त्वपूर्ण मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही मागणी पूर्ण करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने राज्यराणी व जनशताब्दी एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिल्याचे खासदार राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.