शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

"पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली", राजू शेट्टींचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 4:42 PM

चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाला राजू शेट्टींचा पाठिंबा. गेल्या पाच दिवसापासून प्रांत कार्यालया समोर सुरू आहे उपोषण.

चिपळूण : महापूराच्या आपत्तीनंतर पुरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो. मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. तिथे शासकीय निधीची कमतरता भासत नाही. चिपळूणच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषण करावे लागते हे दुर्देव आहे. सरकारला आता पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली असल्याचे मत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले.वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पुररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून प्रांत कार्यालया समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली.

चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने, सतीश कदम, बापू काणे, शिरीष काटकर यांनी उपोषणामागील हेतू स्पष्ट केला. चिपळूणला महापूराचा कसा तडाखा बसला, शहर व परिसरात महापूराच्यावेळी कशी परिस्थिती होती, त्याचे कथन केले. गेल्या ५० वर्षात शासनाने गाळ काढला नाही. आता गाळ काढल्याशिवाय पर्याय नाही. गाळ निघत नसल्याचे लोकांना उपोषण करावे लागते आहे.यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सांगली, कोल्हापूरसह चिपळूणलाही महापूराचा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत चिपळूणकरांचे मोठे नुकसान झाले. न भरून येणारी हानी झाली, हे वास्तव आहे. २००५ मध्ये महापूरानंतर जशी शासनाकडून मदत झाली, तशी यावेळी झाली नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि उपाययोजनेकडे केंद्र व राज्य सरकारकचे साफ दुर्लक्ष झाले आहे. हे नाकारता येणार नाही. या रार्ज्यकर्त्याना भ्रष्टाचार करायला पैसा आहे. मोठ-मोठ्या शहरावरच ते खर्च करतात. राज्यातील इतर भागात गावे, शहरे आहेत की नाहीत. कोरोनाचे कारण देऊन मदत देण्याचे टाळले जाते...माळरानावर शेती केल्यासारखेचमात्र याच कोरोना कालावधीत शासनाने अव्वाच्या सव्वा दराने वस्तू खरेदी करून कोट्यावधीची माया मिळवली. याचे आपल्याकडे पुरावे आहेत. अनेक आमदार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विकास कामांच्या टक्केवारीत गुंतले आहेत. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवणार. त्यामुळे आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून कामांची अपेक्षा ठेवायची म्हणजे माळरानावर शेती केल्यासारखेच आहे.जनतेने परशुरामाचा अवतार घेऊन सहभागी व्हायला हवेतापमान वाढीमुळे पर्यावरणाचा ह्राय झालाय. केव्हाही कधीही पाऊस पडतो. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलंय. यापुढील कालावधीत असेच सुरू राहणार, त्याला पर्याय नाही.  सरकारनेच याचे योग्य उत्तर शोधायला हवं. शांतपणे आंदोलन केले की त्याकडे लक्ष दिले जात नाही. राजकारण आणि द्वेश बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. उपोषणाचा लढा जोमाने लढण्यासाठी जनतेने परशुरामाचा अवतार घेऊन यात सहभागी व्हायला हवे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRaju Shettyराजू शेट्टी