शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राजवाडी पॅटर्न प्रत्येक तालुक्यात हवा

By admin | Published: April 26, 2016 11:16 PM

सतीश कामत : ‘राजवाडी भाजी’ला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद

शेतकऱ्यांना खरेदीची हमी आणि ग्राहकांना सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या दर्जेदार भाज्या नियमितपणे व वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गद्रे इन्फोटेकच्या माध्यमातून ‘राजवाडी भाजी’ हे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून दरदिवशीच्या उपलब्ध भाज्या समजतात. साहजिकच भाज्यांची आॅर्डर देणेही सोपे झाले आहे. उत्पादनाबरोबरच त्याचा दर्जा टिकविणे आणि तो वाढविणे, हे खरे आव्हान आहे. सध्या रत्नागिरी शहराच्या तुलनेने १ टक्काही भाजीचा पुरवठा करू शकत नाही. यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार होणे गरजेचे आहे. ‘राजवाडी भाजी’चा पॅटर्न तयार झाला तर त्या तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ आपोआपच मिळेल, असे मत ‘राजवाडी भाजी पॅटर्न’ यशस्वी करणारे सतीश कामत व्यक्त करतात. मूळ राजवाडी (ता. संगमेश्वर) गावचे सतीश कामत पत्रकारितेच्या माध्यमातून ३६ वर्षे पुण्यात होते. मात्र, गावची ओढ कायमच राहिली. २००६ साली राजवाडीत परत वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी ‘पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट’ (पेम) या संस्थेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना उन्हाळी शेतीसाठी सक्रिय केले. एवढेच नव्हे; तर या सर्व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रूचकर भाज्यांना सोशल मीडियाचा वापर करून रत्नागिरी शहरातील महिलावर्ग ग्राहक म्हणून जोडून दिला. रत्नागिरीतील केवळ नोकरी करणाऱ्याच नव्हे; तर अगदी गृहिणी असणाऱ्या भगिनींनी स्वच्छ धुवून, चिरून प्रसंगी शिजवून मिळणाऱ्या या ‘राजवाडी भाजी’च्या उचलून धरलेल्या या आगळ्यावेगळ्या अशा प्रकल्पाविषयी सतीश कामत यांच्याशी साधलेला संवाद...!प्रश्न : राजवाडीत भाजी लागवडीची चळवळ कशी सुरू झाली?उत्तर : माझे वास्तव्य पुण्यात असले तरी मी अधूनमधून माझ्या गावी येत असे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार सतत मनात यायचाच. पण, नेमके काय करायचे, हे निश्चित केले नव्हते. २००६ साली राजवाडीला कायमस्वरूपी परतल्यानंतर हा विचार अधिक प्रबळ झाला. २००७ सालापासून शेतकरी व महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. २००८ साली पहिल्यांदाच या सर्वांना बरोबर घेऊन सामूहिक भाजीपाला लागवडीचा उपक्रम राबवला. यासाठी जमीन आणि पाणी हे दोन घटक महत्त्वाचे असतात. ते मी उपलब्ध करून दिले. पण, हा या हंगामापुरताच प्रयोग होता. त्यामुळे मिळेल त्या किमतीला त्या भागातच या भाजीची विक्री झाली. मात्र, त्यानंतर शेतीचे प्रयोग सुरूच राहिले. त्यानंतर २०१४मध्ये उन्हाळी भाजी लागवडीचा दुसरा प्रयोग राबवला. हा भाजी लागवडीचा प्रयोग करताना शेतकऱ्यांना पाणी देणे महत्त्वाचे असल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. पुण्याच्या ‘बासुरी फाऊंडेशन’ने केलेल्या आर्थिक मदतीमुळे राजवाडीच्याच काही वाड्यांमधून बारमाही वाहणाऱ्या नदीतून दीड मीटरची पाईपलाईन टाकून १५ एकर क्षेत्रावर भाजीपाला व कडधान्य लागवड केली. त्यामुळे या हंगामात शेतकरी गटाने भेंडी, गवार, माठ, मुळा, वाल, चवळी, पावटा आदी उत्पादने या शेतकऱ्यांनी घेतली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. यातून सत्तर हजारच्या आसपास विक्री व्यवसाय झाला. यातूनच सध्या सुरू असलेल्या ‘राजवाडी भाजी’साठी हुरूप आला. यातून आणखी एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे वर्षातून दोन वेळा भाजीपाला आणि कडधान्ये लागवड शक्य आहे. प्रश्न : यावर्षी कशा प्रकारे भाजीपाला आणि कडधान्य लागवड केली?उत्तर : यंदाही हा उपक्रम जास्त परिणामकारकपणे राबवण्यासाठी दापोलीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पराग हळदणकर गेली दोन वर्षे बारमाही भाजीपाल्याचा अभ्यास करीत आहेत. यावर त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे भाज्यांची निवड, विक्री आदीसंदर्भात गेल्या नोव्हेंबरपासून या शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन सुरु केले आहे. यावर्षी तर राजवाडीतील शेतकऱ्यांसोबत धामणी, शेंबवणे, चिपळूण तालुक्यातील नायशी आदी शेतकऱ्यांचे गट सहभागी झाले. माठ, पालक आणि मुळा या तीन पालेभाज्यांनी सुरुवात झालेल्या या उपक्रमामध्ये आता भेंडी, गवार, दुधी भोपळा, ढोबळी मिरची, वांगी याचबरोबर सुरण, घोरकंद यांसारखी कंदपिके, मिरची, कोंथिबीर, कढीपत्ता आदींचा समावेश आहे. प्रश्न : रत्नागिरी शहरात या भाज्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ कशी शोधली?उत्तर : पुण्यात असताना मी शेकाप नेते शरद जोशी यांची चळवळ जवळून पाहिली होती. शेतीविषयक बिनतोड अर्थशास्त्र मांडणाऱ्या जोशींच्या विचारांचा महत्त्वाचा प्रभाव माझ्यावर होता. कष्ट करून उत्पादित केलेली भाजी नाशिवंत असल्याने मिळेल त्या दरात शेतकरी ती विकतात, हे मी पुण्यात पाहिलं होत. त्यामुळे या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणे गरजेचे होते. यादृष्टीने जवळ म्हणजे रत्नागिरी शहर होते. सुरूवातीला या भाजीविक्रीसाठी माझ्या रत्नागिरीतील मित्रमंडळींचे सहकार्य मिळाले. प्रश्न : व्हॉट्सअ‍ॅपवर ‘राजवाडी भाजी’ या संकल्पनेविषयी थोडक्यात?उत्तर : ही सूचनाही माझ्या या मित्रमंडळींची होती. शेतकऱ्यांना खरेदीची हमी मिळावी आणि ग्राहकांना सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या दर्जेदार भाज्या नियमितपणे व वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम अतिशय प्रभावी होते. यावर ‘राजवाडी भाजी’ या नावानेच ग्रुप स्थापन करण्यात आला. उपलब्ध असलेल्या भाज्या आणि त्यांचे दर या ग्रुपवर आदल्या दिवशी जाहीर केले जातात आणि त्यानुसार ग्रुपवरील सदस्यांकडून मागणी नोंदवली जाते. प्रश्न : पालेभाज्या भाज्या धुवून, चिरून देणे कसे काय परवडते?उत्तर : पुण्यात हा प्रयोग सुरू आहे. रत्नागिरीतही एक - दोघांनी भाज्या विकत घेऊन त्या धुऊन, चिरुन तर फळभाज्या धुवून, साफ करुन पाकिटांमध्ये भरुन देण्याचा प्रयोग केला होता. मात्र, तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. मात्र, राजवाडी भाजीच्या बाबतीत विचार केला तर उत्पादन करणारे शेतकरी हेही काम करू शकतात. त्यामुळे स्वतंत्र मनुष्यबळ वापरून त्यावर खर्चही करायला नको. प्रश्न : व्यवस्थापन कसे सांभाळता?उत्तर : यात महत्त्वाचा भाग जो वितरण व्यवस्थेचा होता, हा विक्रीचा तंबू अभिजीत शेट्ये पहिल्या दिवसापासून सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबरच आता रोशन वरेकर, कौस्तुभ दीक्षित, गौरांग आगाशे यांचीही वितरणासाठी मोलाची मदत होत आहे. रत्नागिरी शहरात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ‘राजवाडी भाजी’ मिळते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ‘राजवाडी भाजी’चे आताच ३५० नोंदणीकृत सदस्य झाले आहेत. ८ जानेवारीला हा उपक्रम सुरू झाला. या तीन महिन्यांचा डाटा अभिदादाच्या सहकार्याने अपडेट केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी प्रत्येक महिन्याला मोबदला मिळत आहे. प्रश्न : यात कुठल्या समस्या आहेत का?उत्तर : ग्राहकांची संख्या वाढत आहे. उन्हाचा कडाका अजून दीड महिना राहील, असे समजायला हरकत नाही, त्याचबरोबर पावसाळ्याचे दोन महिने पुरवठा कमी न पडणे, हे खरे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी शेतकऱ्यांचे नेटवर्क वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आॅगस्टमध्ये उत्पादन देऊ शकतील, असे शेतकरी आतापासूनच सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - शोभना कांबळे