रत्नागिरी : रमजानचे तीस रोजे पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी चंद्र दर्शनानंतर मशिदीतून शुक्रवार दि. १४ मे रोजी रमजान ईद साजरी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. गुरुवारी आखाती प्रदेशात रमजान ईद साजरी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते ११ बाजारपेठ खुली असल्याने दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मुस्लीम भाविकांनी गुरुवारी शेवटचा रोजा ठेवला होता. सायंकाळी रोजा इफ्तारनंतर घरोघरी ईदची तयारी सुरू झाली. रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त विशेष नमाज अदा केली जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून रमजान ईद सणावर कोरोनाचे संकट आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ईदची नमाज भाविकांना घरीच अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्र दर्शन सोशल मीडियावर ईदनिमित्त शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली.