अडरे : चिपळूण तालुक्यातील अडरे गावाचे सुपुत्र कॅप्टन रामचंद्र पाष्टे (६७) यांचे साेमवारी अल्पशा आजाराने निधन झाले़ पंधरा दिवसांपूर्वी पत्नीचेही निधन झाले होते.
कॅप्टन रामचंद्र पाष्टे १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी देशसेवेसाठी सैन्यात भरती झाल्यावर १९६५ ला भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात तब्बल २३ दिवस तळ ठोकून पाकिस्तानी सैनिकांना सळो की पळो करून सोडले हाेते़ एवढेच नव्हे तर पाकिस्तानचं अलहर नावाचं रेल्वे स्टेशन ही पूर्णपणे त्यावेळी उद्ध्वस्त करण्यात आले होते. सहाव्या मराठा रेजिमेंट ऑररीचे कॅप्टन पाष्टे साक्षीदार होते. ३१ वर्षे सैन्य दलात सेवा केल्यानंतर २० वर्षे निवृत्तीची कुटुंबाबरोबर अडरे येथे काढली. त्यांची दोन मुले सुभेदार संदीप पाष्टे तर नाईक सुनील पाष्टे हे दोघेही निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.