वाटूळ : काेकण विभागाचे शिक्षक मतदार रामनाथ माेते यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने जिल्ह्यातील शिक्षकांना ‘रामनाथ माेते भूषण पुरस्कार’ जाहीर केले आहेत.
काेकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. रामनाथ माेते यांच्या निधनानंतर काेकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव यांनी माेते सरांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी प्रतिवर्षी शिक्षकांच्या सन्मानार्थ पुरस्कार तसेच रत्नागिरी जिल्हयात स्मारक बांधण्याचा संकल्प केला हाेता. ही संकल्पपूर्ती करताना राजापूर तालुक्यात दत्तवाडी हायस्कूलच्या प्रांगणात २१ एप्रिलराेजी काेकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी व दत्तवाडी शिक्षण संस्था अध्यक्ष प्रसाद (मुन्ना) पंगेरकर या तिघांच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये राजापूर - प्रमाेद खरात (मुख्याध्यापक, आदर्श विद्यामंदिर, वाटूळ), साधना कुलकर्णी (आडिवरे हायस्कूल), लांजा - बाजीराव देवकाते (शिपाेशी हायस्कूल), वृशाली काेत्रे (काेतवडे हायस्कूल), रत्नागिरी - याेगेश शेट्ये (हरचेरी हायस्कूल), मानसी विचारे (जयगड हायस्कूल), संगमेश्वर - प्रकाश वीरकर (बुरंबी हायस्कूल), सुप्रिया गार्डी (देवळे हायस्कूल), चिपळूण - रत्नाकर मिसाळ (कळंबट हायस्कूल), श्रेया दळी (मार्गताम्हाणे हायस्कूल), गुहागर - अभय जाेशी (वाघांबे हायस्कूल), दीपाली कांबळे (अंजनवेल हायस्कूल), खेड - दत्तात्रय जासूद (सैनिक स्कूल, जामदे), स्मिता सरदेसाई (लवेल हायस्कूल), दापाेली - रियाज म्हैसाळे (दापाेली), भक्ती सावंत (करंजाणी). मंडणगड - मनाेज चव्हाण (मंडणगड).
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार साेहळा संचारबंदी संपल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत हाेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.