रत्नागिरी : दवाखान्यातून घरी परतताना रिक्षातून उतरणाऱ्या रमेश लक्ष्मण साळवी यांच्या पत्नीच्या हातातील पिशवी रस्त्यावर पडली. दागिने आणि रोख रक्कम असलेली ही पिशवी रिक्षा चालकाला मिळाली. त्याने ती रत्नागिरीतीलच व्यापाऱ्यांकडे दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून याची माहिती पसरताच ही पिशवी परत मिळाली. या घटनेनंतर आजही सुजाण नागरिक रत्नागिरीत आहेत, याचा प्रत्यय आला.गुरूवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आलीमवाडी परटवणे येथे राहणारे वृद्ध रमेश लक्ष्मण साळवी आपल्या पत्नीसह पऱ्याची आळी येथे असणाऱ्या दवाखान्यात आले होते. ढमालणीच्या पारावर रिक्षातून उतरत असताना अनावधानाने साळवी यांच्या पत्नीच्या हातातील पिशवी खाली पडली. या पिशवीत मंगळसूत्र, सर आणि काही रोख रक्कम होती. दवाखान्यातून परतल्यावर रात्री उशिरा पिशवी हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले.ही पिशवी रिक्षाचालक अनिल भोसले यांना रस्त्यात पडलेली सापडली. त्यांनी ती नजीकचे व्यापारी मंदार हेळेकर आणि कौस्तुभ दीक्षित यांच्याकडे दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून ही माहिती रमेश साळवी यांच्या मुलीच्या वाचनात आली आणि त्यांनी मंदार हेळेकर यांच्याशी संपर्क केला. पूर्णत: खात्री पटल्यानंतर ही पिशवी रमेश साळवी यांच्या ताब्यात देण्यात आली.
रत्नागिरी : प्रामाणिक रिक्षाचालकाने दागिने केले परत, सोशल मीडियावरून मिळाली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 4:34 PM
दवाखान्यातून घरी परतताना रिक्षातून उतरणाऱ्या रमेश लक्ष्मण साळवी यांच्या पत्नीच्या हातातील पिशवी रस्त्यावर पडली. दागिने आणि रोख रक्कम असलेली ही पिशवी रिक्षा चालकाला मिळाली. त्याने ती रत्नागिरीतीलच व्यापाऱ्यांकडे दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून याची माहिती पसरताच ही पिशवी परत मिळाली. या घटनेनंतर आजही सुजाण नागरिक रत्नागिरीत आहेत, याचा प्रत्यय आला.
ठळक मुद्देप्रामाणिक रिक्षाचालकाने दागिने केले परत, सोशल मीडियावरून मिळाली माहिती