ठळक मुद्देमागासवर्गीय निधीतून १ कोटी ३४ लाखाची कामे लागणार मार्गीकौन्सिल सभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी
चिपळूण : येथील नगर परिषदेच्या होणाऱ्या कौन्सिलमध्ये मागासवर्गीय निधीतून १ कोटी ३४ लाख ५२ हजार रुपयाची कामे ठेवली जाणार आहेत. दि.१९ रोजी होणाऱ्या कौन्सिल सभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार आहे.मागासवर्गीय निधीतून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय प्रभागातील विकासकामे मार्गी लागणार आहेत.संरक्षक भिंत, रस्ता डांबरीकरण, गटार, नाला बांधणे यासारखी कामे या निधीतून मार्गी लावली जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाणार असल्याने यातून अनेक कामे मार्गी लागतील आणि लोकांना मुलभूत सुविधा मिळतील.