रत्नागिरी : न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. जिल्ह्यात हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा येथील संघटनांनी केला आहे.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेने पुकारलेल्या संपात ए. आय. बी. ई. ए., ए. आय., ओ. बी. सी., ए. आय. बी. ओ. ए.सह एकूण ९ संघटना सहभागी झाल्या आहेत. इंडियन बँक असोसिएशन व भारत सरकारचा २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव नाकारण्यासाठी हा संप करण्यात आला आहे.रत्नागिरीतही या संपात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, स्टेट बँक आॅफ इंडिया तसेच जुन्या खासगी बँकांतील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. रत्नागिरी शहर बँक कर्मचारी समन्वय समितीचे चिटणीस राजेंद्र गडवी यांनी यावेळी विचार व्यक्त केले. आज गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरी : बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प, बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:08 PM
न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. जिल्ह्यात हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा येथील संघटनांनी केला आहे.
ठळक मुद्दे बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्पबँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने