शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

रत्नागिरी : मनोरूग्णालयात रूग्णांचे वाढदिवस उत्साहात, चेहऱ्यावर उमटले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:15 PM

आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

ठळक मुद्देमनोरूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक हवा : जिल्हाधिकारी मनोरूग्णांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

रत्नागिरी : मनोरूग्णालयात  केक कापून ५२ रुग्णांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रूग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटल्याचे दिसत होते.

आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश आनंद सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, मनोरूणालय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे, डॉ. अविनाश ढगे, पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष हेमंत वणजु, तालुकाध्यक्ष राजेश शेळके आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मनोरुग्णालयाच्या कामकाजाबाबत कौतुकही केले. मनोरूग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे, तरच रुग्णांमध्ये चांगले परिवर्तन होईल, या रुग्णांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन  सुनील चव्हाण यांनी केले.मनोरुग्णांच्या विकासासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडूनही राबविण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश असला पाहिजे, असे प्रतिपादन न्यायाधीश आनंद सामंत यांनी केले.सामाजिक बांधिलकीतून आपुलकी व पत्रकारांकडून मनोरुग्णांचा वाढदिवस साजरा केला जाणे, ही बाब उल्लेखनीय असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

डॉ. विलास भैलुमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते नितीन शिवदे यांनी आभार मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी