शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

रत्नागिरी भाजपला हवंय नारायणास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 6:13 PM

shivsena, Narayan Rane, politics, bjp, ratnagirinews शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आहे. राणे यांनी केलेल्या रत्नागिरी दौऱ्यामुळे आणि राणे यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी भाजपला हवंय नारायणास्त्रभाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आहे. राणे यांनी केलेल्या रत्नागिरी दौऱ्यामुळे आणि राणे यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही वर्षात शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यावर आपला एकछत्री अंमल कायम ठेवला आहे. इतर कोणत्याही पक्षाला मर्यादेपेक्षा अधिक यश मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रमाणात हातपाय पसरले आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ शिवसेनेचेच प्राबल्य आहे. जोवर भाजप आणि शिवसेनेची युती होती, तोवर भाजपला कुठे ना कुठे यश मिळत होते. मात्र, ही युती तुटल्यानंतर भाजपलाही मर्यादीतच यश मिळत आहे.सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याची तयारी केली जात आहे. त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद जिल्ह्यात खूप कमी आहे. त्यामुळे भाजपच्यादृष्टीने सर्वात मोठी लढाई शिवसेनेसोबत आहे. म्हणूनच शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला आक्रमक नेतृत्त्वाची गरज आहे.

ही गरज माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच पूर्ण करू शकत असल्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते करत आहेत. पुढील वर्षी काही नगर परिषदा आणि नगर पंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी राणे यांनी आतापासूनच पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत.शिवसेनेत नाराजीगेल्या काही काळात शिवसेनेत बरीच अस्वस्थता पसरली आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. महत्त्वाच्या विषयांमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारातच घेतले जात नाही. त्यामुळे रत्नागिरी शहरातील अनेक पदाधिकारीही पक्षातील निर्णयांमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे नाराजीचे प्रमाण वाढत आहे. ही नाराजी भाजपच्या फायद्याची ठरावी, नाराजांनी भाजपमध्ये यावे, यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठीच राणे यांच्या नेतृत्त्वाची अपेक्षा भाजप कार्यकर्ते करत आहेत.राणे यांचीही तयारीनारायण राणे यांनी नुकताच रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूपच उत्साहाचे वातावरण होते. राणे यांनी आता रत्नागिरीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी मांडण्यात आली. त्याला राणे यांनीही संमत्ती दर्शवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या विषयात विशेष लक्ष घातले आहे. रत्नागिरीतील पाणी योजनेसाठी झालेल्या जागा खरेदीचा विषय आपण तडीस नेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना