रत्नागिरी : कोकणात १५ ते १६ मार्च या कालावधीत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात या दोन दिवसांच्या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधूनमधून उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सध्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता १५ आणि १६ मार्च रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह (ताशी ३० ते ४० किलोमीटर) हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.