रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.रत्नागिरी शहरातही पावसाचा सकाळपासूनच जोर असल्यामुळे शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील अडरे नदीला पूर आला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने विद्यार्थी, कामगारांना पुन्हा माघारी फिरावे लागले. वशिष्ठी नदीने पुन्हा पातळी सोडल्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे.नदीतील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कान्हे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्गही बंद झाला आहे. असाच पाऊस राहिल्यास पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळित होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. पावसामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी झाले असून चांदेराइ - लांजा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर ५ फूट पाणी आहे.संगमेश्वर तालुक्यात सलग मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, माखजनला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा चिंचुर्टी येथे जाणाºया घाटातील मार्गावरील मोरी वाहून गेल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांना १० किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे.राजापूर शहरातपुन्हा पुराचे पाणीअर्जुना व कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे शाळा-महाविद्यालये सोडून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळपासून शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सोमवारी शिवाजी पथ मछी मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले होते . पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.
रत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 5:44 PM
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेरवली कोंड येथे विद्युत भारीत तार तुटून दोन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ७.३० वाजता घडली आहे.
ठळक मुद्देरत्नागिरीत संततधार, शाळा सोडल्या, राजापूर पुन्हा जलमय