Ratnagiri: चिपळूणच्या मित्र-मैत्रीण ग्रुपला 'तिरिपती' कोल्हापूरातच पावला! अजित पवारांनी दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 09:31 PM2023-08-15T21:31:43+5:302023-08-15T21:33:23+5:30

Ratnagiri: ख्यमंत्री अजित पवार यांची कोकणातील चिपळूण येथील माजी नगरसेविकांसह मित्र-मैत्रिणी ग्रुपच्या सदस्यांना चिपळूण शहराचा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून गाळ उपश्यासाठी ठोस निधीचे आश्वासन दिले.

Ratnagiri: Chiplun's group of friends met 'Tiripati' in Kolhapur! Ajit Pawar promised | Ratnagiri: चिपळूणच्या मित्र-मैत्रीण ग्रुपला 'तिरिपती' कोल्हापूरातच पावला! अजित पवारांनी दिलं आश्वासन

Ratnagiri: चिपळूणच्या मित्र-मैत्रीण ग्रुपला 'तिरिपती' कोल्हापूरातच पावला! अजित पवारांनी दिलं आश्वासन

googlenewsNext

चिपळूण - विमानतळावरून मुंबईकडे निघालेकोल्हापूर ल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोकणातील चिपळूण येथील माजी नगरसेविकांसह मित्र-मैत्रिणी ग्रुपच्या सदस्यांना चिपळूण शहराचा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून गाळ उपश्यासाठी ठोस निधीचे आश्वासन दिले. पावसाळा संपलाच निधी व यंत्रसामुग्री देतो आहे. काळजी करू नका, असा शब्द देताच या सदस्यांनी तिरुपती कोल्हापुरात पावला अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर येथील मित्र-मैत्रीण ग्रुप  मंगळवारी दुपारी तिरुपती येथे जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उभे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनपेक्षितपणे भेट झाली. या भेटीत माजी नगरसेविका आदिती देशपांडे यांच्या सह अन्य सदस्यांनी चिपळूणच्या महापुराचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शेखर निकम आणि समस्त चिपळूणवासियांना सर्वतोपरी मदत करा, अशी विनंती  पवार यांना केली. त्यावेळी त्यांनी पाऊस संपल्यावर लगेच निधी आणि आवश्यक यंत्र सामुग्री देतो, असे आश्वासन दिले आहे. यावेळी माजी नगरसेविका देशपांडे यांच्या समवेत डॉ.विकास जोगळेकर, मंजुषा जोगळेकर, प्रकाश कदम अजय देशपांडे, माया कदम, सनी भाटिया व आरोही भाटिया उपस्थित होत्या.

याविषयी माजी नगरसेविका देशपांडे यांनी सांगितले की, या भेटीत अजित पवार यांनी आम्हाला मोठा शब्द देऊन धीर दिला. अजितदादांच्या या कार्यपद्धतीवर मित्र-मैत्रिणी ग्रुपचे सर्व सदस्य खुश झाले. त्याबद्दल अजित दादांचे धन्यवाद मानले व त्यानंतर आमचा ग्रुप पुढे श्री तिरुपतीच्या दर्शनासाठी रवाना झाला. मात्र चिपळूणच्या भल्यासाठी आम्हाला तिरुपतीचे दर्शन कोल्हापुरातच झाले अशी अनुभूती आल्याच्या भावना व्यक्त केल्या. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपश्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही, त्यामुळे अजित दादांनी आम्हाला दिलेला शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ratnagiri: Chiplun's group of friends met 'Tiripati' in Kolhapur! Ajit Pawar promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.