शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

रत्नागिरी शहर भाजपने केले खड्ड्यांत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 8:14 PM

muncipalty, roadsefty, bjp, ratnagirinews नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी भरणार? असा प्रश्‍न उपस्थित करत रत्नागिरी शहर भाजपतर्फे गुरूवारी आठवडा बाजार परिसर, गांधी कॉलनी येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भाजपच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती.

ठळक मुद्देरत्नागिरी शहर भाजपने केले खड्ड्यांत वृक्षारोपणखराब झालेल्या रस्त्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

रत्नागिरी : नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी भरणार? असा प्रश्‍न उपस्थित करत रत्नागिरी शहर भाजपतर्फे गुरूवारी आठवडा बाजार परिसर, गांधी कॉलनी येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भाजपच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती.

शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. भाजपने नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करत ह्यरस्त्यावरील खड्डे भरा नाहीतर खुर्च्या खाली कराह्ण, ८ दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला.गेली काही वर्षे शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. एकदा केलेल्या कामानंतर रस्त्यांवर पुन्हा डांबर टाकावे लागते, एकदा केलेला रस्ता किती वर्षे टिकला पाहिजे याबाबतही नियम, निकष आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी नगराध्यक्षांनी यात लक्ष घालून रस्ते चकाचक करावेत. ज्यांनी नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांना निवडून दिले त्या जनतेची कामे करावीत, असा टोला भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांना लगावला.

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना समस्यांबाबत पत्र पाठवले तरीही त्यांच्याकडून उत्तर दिले जात नाही, जनतेच्या रोषाला कारणीभूत होऊ नका, असा इशाराही पटवर्धन यांनी दिला. केंद्र सरकारकडून रत्नागिरी नगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले. परंतु शहरातील समस्या कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहर भाजपतर्फे गुरूवारी सकाळी आठवडा बाजार येथील गांधी कॉलनीच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर माळनाका येथील खराब झालेल्या रस्त्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी विनय मलुष्टे, संदीप सुर्वे, नगरसेवक राजेश तोडणकर, राजन पटवर्धन, राजश्री शिवलकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, राजन फाळके, संदीप रसाळ, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, माजी शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नंदू चव्हाण, हर्ष दुडे, अशोक वाडेकर, प्राजक्ता रुमडे, रामा शेलटकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, पमू पाटील, अमन काझी, बबलू शर्मा, वेदिका गवाणकर उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाroad safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी