शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय रूपडे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:08 PM

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय रूपडे बदलणार झाडांचेही रोपण, वाहन पार्किंगची व्यवस्था अखेर मार्गी

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २०१३ साली दोन प्रशासकीय इमारती बांधण्यात आल्या आहेत. यापैकी एका इमारतीत जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, सभागृह तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रशासनातील विविध विभाग स्थलांतरीत करण्यात आले आहेत. तर नजिकच्या दुसऱ्या नव्या इमारतीत तहसील कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालये हस्तांतरित करण्यात आली आहेत. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय तसेच कोषागार कार्यालय आणि अन्य कार्यालये कार्यरत आहेत.गतवर्षांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरातील इतर शासकीय कार्यालये यामध्ये कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारी वाहनांची गर्दी आता थांबली असून, या कार्यालयासमोरील परिसर मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक कार्यालयांच्या जुन्या इमारती होत्या. त्यापैकी काही कार्यालये दुसरीकडे हलविण्यात आली असून, या इमारतींचे गतवर्षांपासून निर्लेखन करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा परिसर अधिकच मोकळा झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालय प्रशस्त व्हावे, यादृष्टीने मोकळ्या करण्यात आलेल्या जागेचे सपाटीकरण करण्यात येत असून, प्रवेशद्वारापासून झाडे लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने सध्या बांधकाम सुरू करण्यात आले असून, यावर्षी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोकळा परिसर विविध झाडांनी सुशोभित झालेला दिसणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी