शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रत्नागिरी : सांबरेकर मृत्यूप्रकरणी नगर परिषदेत हंगामा, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:18 PM

चिपळूण येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या कपिल सांबरेकर याचे शवविच्छेदन झाल्यानंतरही रिपाइंसह बौध्द समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त भीमसैनिकांनी जोरदार घोषणा देत नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देसांबरेकर मृत्यूप्रकरणी नगर परिषदेत हंगामा, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार  दालनात जाऊन नगराध्यक्षांना धरले धारेवर, चोख पोलीस बंदोबस्त तैनात

चिपळूण : येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या कपिल सांबरेकर याचे शवविच्छेदन झाल्यानंतरही रिपाइंसह बौध्द समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त भीमसैनिकांनी जोरदार घोषणा देत नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना धारेवर धरले.शिवसेनेच्यावतीनेही नगराध्यक्षांना जाब विचारण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. दुपारनंतर सत्ताधाऱ्यांनी आर्थिक मदत दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.सोमवारी दुपारी चिपळूण येथील जलतरण तलावात कपिल सांबरेकर हा आपले मित्र अतीश कदम, सौरभ रामगडे, अक्षय रामगडे (सर्व रा. सावर्डे) यांच्यासह पोहायला गेला होता. जलतरण तलावात उतरताना त्यांना सुरक्षेची साधने देण्यात आली.

सुरुवातीला कपिलचे तीनही मित्र चार फूट पाण्यात पोहत होते. त्यावेळी कपिल बाहेर बसून मोबाईलवर संभाषण करत होता. जलतरण तलाव बंद होण्यापूर्वी कपिलने अचानक रॅम्पवर जाऊन खोल पाण्यात उडी घेतली. बराचवेळ तो वर आली नाही म्हणून सुरक्षारक्षकांसह अन्य दोघांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.कपिल सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत होता. उत्कृष्ट क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच सावर्डे व चिपळूण येथील नातेवाईक व भीमसैनिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जलतरण तलावाच्या ठेकेदाराच्या व प्रशिक्षकाच्या हलगर्जीपणामुळे कपिलचा बळी गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

कामथे उपजिल्हा रुग्णालय व चिपळूण पोलीस स्थानक येथे अनेक भीमसैनिक व शिवसैनिक यांनी हा विषय लावून धरला होता. वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यावर मृतदेह ताब्यात घेतो, असे प्रथम सांगण्यात आले होते. परंतु, गुन्हा दाखल झाल्यावरही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला.आज मंगळवारी सकाळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व बौध्द समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी नगर परिषदेजवळ एकत्र जमले. त्यांनी सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्यांनी विविध प्रश्न विचारुन नगराध्यक्षांना भांडावून सोडले.या जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नसून, ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले नसल्याची चर्चा सुरु होती. कपिलचा बळी गेल्यानंतर नगर परिषदेने कागदपत्र तयार केल्याचीही चर्चा होती. दरम्यान, मुख्याधिकारी पालिकेत नसल्याने व ठेकेदारही संपर्कात नसल्याने जमाव अधिक चिडला होता.

संतप्त भीमसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांना व ठेकेदाराला बोलवून घ्या, असे सांगितले. आपल्या नियोजित बैठकीसाठी मुख्याधिकारी पंकज पाटील रत्नागिरी येथे गेले होते. ते दुपारी येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी तासभर उशिरा आले तरी चालतील पण त्यांना बोलवा, असे नगराध्यक्षांना सांगण्यात आले.

यावेळी जमाव अधिक आक्रमक झाला होता. त्याच दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक व शहरातील पदाधिकारी यांनी नगराध्यक्ष दालनात प्रवेश करुन ठेकेदाराला तत्काळ बोलवून घ्या व या सर्व प्रश्नांची आम्हाला उत्तरे द्या, असे खडसावले.नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी उपस्थित सर्वांच्या प्रश्नांना आपल्यापरीने उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही काळ लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर नगराध्यक्षांनी सर्व सत्ताधारी नगरसेवकांसह चर्चा करून वैयक्तिक स्वरुपात मदत देण्याचे ठरविले.

पीडित कुटुंबाला सव्वा लाख रुपयांची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ठेकेदारावर पालिकेकडून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नगराध्यक्षा व उपस्थित कार्यकर्ते पीडित कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात गेल्या. नगराध्यक्षा खेराडे यांनी तोडगा काढल्यानंतर त्यांनी आपली भूमिका समजावून सांगितली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.मृत्यू संशयास्पद : रघुनाथ सांबरेकरहा मृत्यू संशयास्पद असून, हा घातपात असावा, असा संशय कपिलच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील रघुनाथ सांबरेकर यांनी व्यक्त केला. कपिल कुणाला न सांगता घरातून बाहेर आला होता. त्याला पोहायला येत नव्हते. मग तो पोहायला गेला कसा ? त्याने उडी मारली आणि तो बुडाला, असे लोक सांगतात. पण त्यावेळी इतर तीन मित्र काय करत होते ? ते मजा बघत होते काय ? याप्रकरणी प्रशिक्षकानेही दुर्लक्ष केले. पालिकेचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद आहे, असा आरोप सांबरेकर यांनी केला.मुख्याधिकारी गैरहजरमुख्याधिकारी पंकज पाटील हे रत्नागिरीहून दुपारपर्यंत येतील, असे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारपर्यंत ते आले नाहीत, त्यांनी दुर्लक्ष केले. या निषेधार्थ कपिल सांबरेकर याचा मृतदेह चिपळूण नगर परिषदेत दुपारी ३.३० वाजता आणण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारिपचे सचिव विनोद कदम, बौध्द महासभेचे अध्यक्ष सुभाष जाधव, रिपाइंचे माजी तालुकाध्यक्ष के. डी. कदम, शहरप्रमुख राजू देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारिपचे युवक जिल्हाध्यक्ष मुजफ्फर मुल्लाजी, वैभव सावंत, रमण मोहिते उपस्थित होते.नगराध्यक्षांसह पाचजणांवर गुन्हाकपिल सांबरेकर जलतरण तलावात बुडून मृत्यूमुखी पडला, याप्रकरणी गणपत भांबू सावंत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांनी ठेकेदार, प्रशिक्षक, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणामुळे जलतरण तलावात पोहायला गेलेला युवक बुडाल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात केली असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात