रत्नागिरी : उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर बदलण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.सध्या उष्म्यामुळे नागरिक हैराण आहेत. उष्म्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. ही संधी साधून महावितरण कंपनीने ग्राहकांना जणू लुबाडण्यास सुरुवात केली आहे. महावितरणकडून एप्रिल व मे महिन्यात वितरित करण्यात आलेली वीजबिले ३० ते २५०० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून आली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांचा महावितरण अधिकाऱ्यांना सामना करावा लागत आहे.राजिवडा, तेलीआळी, खालची आळी, जयस्तंभ आदी परिसरातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. याच परिसरात बिले वाढवून आली आहेत. दोन दिवसांपूर्वी याच प्रश्नावर महावितरणच्या झाडगाव येथील कार्यालयावर विविध ठिकाणच्या सुमारे २० ते २५ ग्राहकांनी अचानक धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.ज्या ग्राहकाचे सरासरी बिल १७०० होते, त्या ग्राहकाला अडीच हजार रुपयांपर्यंत बिल आले आहे. एका ग्राहकाला तर महावितरणने मोठाच फटका दिला आहे. सरासरी बिल दीड हजार येत असताना महावितरणने या महिन्यात सुमारे ४ हजार बिल पाठवले आहे. यातील काही ग्राहकांनी एवढे विजबिल भरण्यास असमर्थता दर्शवली आहे.काही ग्राहकांचे मीटर बदलले जाणार असून, काही मीटरची तपासणी केली जाणार आहे तर काही बिले ही नजरचुकीने पाठवण्यात आल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी कबूल केले. या एकूणच प्रकारामुळे ग्राहक मात्र चांगलाच वैतागला आहे. बिल कमी करून देण्यासही वेळ लागत असल्याने ग्राहकाची कुचंबणा झाली आहे.बिलावर रिडिंगच नाहीअचूक बिलाची प्रत ग्राहकांना मिळावी, यासाठी महावितरणने वीजबिलावर मीटरचा फोटो देण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या काही महिन्यात वीजबिलावरील फोटोमध्ये केवळ मीटरचा क्रमांकच दिसतो, त्यामध्ये रिडिंग दिसत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.नवीन मीटर बदलूनही...?महावितरण कंपनीने काही ग्राहकांचे वीजमीटर आधीच बदलले. मात्र, त्यानंतरही त्यांना वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत, अशा मीटरची पुनर्तपासणी केली जाईल, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.हप्त्याने बिलकाही ग्राहकांना वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने त्यांनी ती भरण्यास नकार दिला. मात्र, सध्याची बिले भरा, तुम्हाला मीटर बदलून दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच बिल येईल, असे सांगून त्यांना बिल काही हप्त्यात भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.मोबाईलवर फोटो?यापूर्वी वीजमीटरचे फोटो हे कॅमेऱ्याने टीपले जायचे. त्यामुळे रिडींगचा फोटो येत होता. मात्र, आता हे फोटो साध्या मोबाईलने काढले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी : भरमसाठ बिलांनी मोडले ग्राहकांचे कंबरडे, मे महिन्यात मोठा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:47 PM
उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर बदलण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.
ठळक मुद्देभरमसाठ बिलांनी मोडले ग्राहकांचे कंबरडे, मे महिन्यात मोठा झटका अनेक ग्राहकांची महावितरणकडे धाव