रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) रत्नागिरी जिल्ह्यात भरती करण्यात आलेल्यांमध्ये स्थानिकांना डावलण्यात आले आहे, त्यामुळे ही भरती स्थगित करा, अन्यथा परजिल्ह्यातील उमदेवारांना हजर होऊ देणार नाही, असा इशारा तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांनी दिला असून, तसे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.ह्यउमेदह्णमध्ये सुमारे ४४ पदांकरिता आॅनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या भरतीत स्थानिक उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्यापैकी काही मोजक्याच स्थानिक उमेदवारांची निवड झाली.रत्नागिरीतील स्थानिक होतकरु उमेदवारांना किरकोळ कारणांवरुन हेतूपुरस्सर डावलण्यात आले आहे. त्यांच्या जागी परजिल्ह्यातील उमेदवारांची वर्णी लागली आहे. काही उमेदवारांनी याचा जाबही विचारला; मात्र संबंधित यंत्रणेच्या अधिकाºयांनी थातरुमातूर उत्तरे देत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.याबाबत अन्यायग्रस्त उमेदवारांनी युवा सेनेच्या पदाधिकार्याकडे धाव घेतली. तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली अन्यायग्रस्त तरुण आणि युवा सैनिकांनी उमेदच्या अधिकार्याची भेट घेतली व भरतीमध्ये अन्याय झालेल्या तरुणांबाबत विचारणा केली. मुलाखतीवेळी तुमचा अनुभव सांगितला नाहीत, त्यामुळे विचार केला गेला नसावा, असे कारण यावेळी सांगण्यात आल्याने साळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी स्थानिकांना संधी दिली जात नसेल तर त्याचा काय उपयोग; या भरतीला स्थगिती द्या, अन्यथा परजिल्ह्यातील एकाही उमेदवाराला कामावर हजर होऊ देणार नाही, असा इशारा साळवी यांनी दिला. यासंदर्भात ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनाही निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी : उमेद भरतीत स्थानिकांना डावलले, युवा सेनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:58 PM
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) रत्नागिरी जिल्ह्यात भरती करण्यात आलेल्यांमध्ये स्थानिकांना डावलण्यात आले आहे, त्यामुळे ही भरती स्थगित करा, अन्यथा परजिल्ह्यातील उमदेवारांना हजर होऊ देणार नाही, असा इशारा तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांनी दिला असून, तसे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
ठळक मुद्दे रत्नागिरी : उमेद भरतीत स्थानिकांना डावलले, युवा सेनेचा आरोप भरती स्थगित करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी