रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे़ कोणतीही लक्षणे नसताना त्यांनी स्वत:हून तपासणी करुन घेतली होती़ यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हेही कोरोना पॉझिटिव्ह आले होते़.जिल्ह्यात अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झालेली आहे़ पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील एका शाखेतील महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आली होती़ तसेच सेतूमधील एक महिला कर्मचारीही कोरोनाबाधित झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हाधिकारी यांनी खबरदारी घेत स्वत:हून क्वारंटाईन करुन घेतले होते़ त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क आलेला नव्हता.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह अभियंता आणि ४ कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते़ त्यामुळे आता प्रत्येक अधिकारी, कर्मचारी स्वत:ची काळजी घेत आहेत़ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्वत:हून तपासणी करुन घेतली़ त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे़ प्रत्येकाने खबरदारी म्हणून स्वत:ची तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे़
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 8:05 PM
रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे़ कोणतीही लक्षणे नसताना त्यांनी स्वत:हून तपासणी करुन घेतली होती़ यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हेही कोरोना पॉझिटिव्ह आले होते़.
ठळक मुद्देरत्नागिरीचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्हकोणतीही लक्षणे नसताना स्वत:हून केली तपासणी