रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आठ नवीन रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८९६० झाली आहे. दिवसभरात १६ रुग्ण बरे झाले असून, एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नसल्याने दिलासा मिळाला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत रविवारी जिल्ह्यातील १६१ नमुन्यांची तपासणी तपासणी करण्यात आली़. त्यांपैकी १५३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आजपर्यंत जिल्हाभरात ५६,८७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील पाच आणि अँटिजेन तपासणीतील तीन रुग्ण आहेत. त्यांमध्ये रत्नागिरी तालुक्यात तीन रुग्ण, खेडमधील दोन आणि दापोली, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ३७ रुग्ण घरातच निगराणीखाली असून, ९७ कोरोनाबाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ३२२ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोनाने रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण ३.५९ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ८४९५ रुग्ण बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८१ टक्के आहे.