रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.एक लाख ग्रंथ संपदा पूर्ण करण्यासाठी सत्नागिरीकरांचा सहभाग आवश्यक असल्याने वाचनालयाचे सभासद तसेच नागरिकांनी किमान आपल्या आवडीचे एक पुस्तक वाचनालयाला भेट द्यावे व लक्ष ग्रंथपूर्तीच्या संकल्पामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले आहे. प्रत्येक वाचनप्रेमी ग्रंथप्रेमी नागरिकाने संकल्पपूर्तीसाठी योगदान दिल्यास हा संकल्प सहज साध्य होईल, असा विश्वास अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.एक लाख ग्रंथ पूर्ती करणे, ही बाब वाचनालयासाठी अभिमानास्पद आहे. एक लाख ग्रंथसंपदा असणारी वाचनालये महाराष्ट्रात मोजकीच आहेत. त्यामध्ये भविष्यात रत्नागिरीच्या वाचनालयाचा समावेश होईल. ग्रंथपूर्ती अभियान राबवल्यामुळे वाचन चळवळीतही जागरूकता येणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 4:24 PM
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देवाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प