दापोली : कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केले.दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या पदवीदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांप्रति बांधिलकी आणि समर्पणाची भावना अंगी बाणवणे आवश्यक आहे. यातूनच भारतातील शेती आणि शेतकरी यांचा विकास होईल, असे सांगितले.
पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे, अधिष्ठाता डॉ. हुकुमसिंंग ढाकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत खांदेतोड, कार्यकारी परिषद सदस्य संजय केळकर, संजय कदम, माजी कुलगुरु डॉ. किसन लवांडे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. संजय भावे, डॉ. यु. व्ही. महाडकर, डॉ. एम. एम. बुरोंडकर, डॉ. केशव पुजारी, डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.पदव्युत्तर स्नातकांमध्ये सन २०१५-१६ करिता चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी), छाया राघो कवितकर (कृषी अभियांत्रिकी), सुभाश्री बिजय मोहपात्रा (उद्यानविद्या), सौरभ सुभाष कदम (कृषी जैवतंत्रज्ञान), उबेद कयुम (एम.एफ.एस्सी.), मिलिंद दिगंबर पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. पदवी स्नातकांमध्ये सन २०१६-१७ वर्षासाठी श्रद्धा भास्कर सावंत (कृषी), टी. आर. बी. भाग्यलक्ष्मी (उद्यानविद्या), दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी), अभिषेक संजय मुळ्ये, रवी अशोक चव्हाण (अन्न तंत्रज्ञान) अंजली काशिराम बी. आदम (कृषी), विनायक बबनराव पाटील (कृषी जैवतंत्रज्ञान), काजल अशोक पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. सन २०१६-१७साठीचे ह्यअस्पीह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) आणि दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी) यांना तर याच वर्षासाठीचे ह्यसर रॉबर्ट अॅलनह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) हिला प्रदान करण्यात आले.सन २०१५-१६साठीचे कै. जी. जी. ठाकरे सुवर्णपदक ए. मोहनकुमार (कृषी) तर याच वर्षासाठीचे हेक्झामार सुवर्णपदक निखत अन्वर तळघरकर (कृषी), सानिका संजय जोशी (कृषी), अश्विनी राजेंद्र चव्हाण (कृषी), चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी) आणि सुभाश्री बिजय मोहपात्रा (कृषी) यांना प्रदान करण्यात आले.
सन २०१६-१७ साठीचे कै. मंदाकिनी सहस्त्रबुद्धे सुवर्णपदक कृष्णजा आर. नायर (कृषी) तर कै. अरुण नायकवाडी सुवर्णपदक श्वेता बसवराज कराडीपाटील (कृषी) विस्तार शिक्षण यांना बहाल करण्यात आले.