शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीत

By admin | Published: December 30, 2016 11:43 PM

मुंबईत ५७२ कोटीची फसवणूक : ठेवींमधून जमलेली रक्कम रत्नागिरीच्या जमिनीत

रत्नागिरी : मुंबईत केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीच्या जमिनीत रूजली असल्यामुळे रत्नागिरी शहर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. या फसवणुकीमध्ये रत्नागिरीत महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे पुढे येत आहे. त्या तपासासाठी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन तपासणी केली आहे.मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ५७२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. त्याची पाळेमुळे रत्नागिरीत असल्याचे समोर आले आहे. जादा व्याजाचे आमिष दाखवून, लोकांची फसवणूक करून उभे केलेले पैसे रत्नागिरीत जमिनीत गुंतवले असल्याचे पुढे येत आहे. याबाबत मुंबईत एका विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करून हा पैसा रत्नागिरीमध्ये जमिनींचे व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवण्यात आला होता. ही माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोेलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे दाखल झाले होते. रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने दोन दिवस या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात आला.या दोन दिवसांच्या तपासात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. मुंबईत ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेतील मोठा हिस्सा रत्नागिरीत जागा खरेदीमध्ये गुंतवण्यात आला आहे. त्यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचा ही सामावेश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी सील करण्यात आलेली कुवारबांव येथील जागा एका तलाठ्याने परस्पर विकली असल्याचे तपासात पुढे आले आहे. (वार्ताहर)