देवरूख : इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून तिघांना जलसमाधी मिळाली. हा दुर्दैवी अपघात काल (बुधवारी) दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झाला. दरम्यान, धामणी येथे याठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी रेलिंग नसल्यानेच गाडी नदीपात्रात गेल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी रस्ते सुरक्षा विभाग व बांधकाम विभागाने लोखंडी रेलिंग बसवावी, अशी मागणी संगमेश्वर तालुक्यातील जनतेतून होत आहे.बारशानिमित्ताने लांजा येथे गेलेले इनोव्हा गाडीतील प्रवासी पनवेलच्या दिशेने परतत असताना, संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून अपघात झाला. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत होती. नदी पात्राशेजारी असणाऱ्या रस्त्याला रेलिंग बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही रेलिंग बसविणे गरजेचे आहे.नातेवाईकांनी हंबरडा फोडलासहा-साडेसहा तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर इनोव्हा कार बाहेर काढण्यात आली. यावेळी गाडीमध्ये अडकलेले ऋतुजा पाटणे, पियुष पाटणे व प्रमिला बेर्डे या तिघांचे मृतदेह बाहेर काढताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. हे मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.कार्यालयाची तोडफोडबुधवारी इनोव्हा गाडीचा झालेल्या अपघात हा महामार्गावरील खड्ड्यामुळेच झाल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांनी चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या कार्यालयावर धडक देत कार्यालयाची मोडतोड केली. महामार्गावरील खड्डे भरण्याकरिता भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीपासूनच रेटा लावला होता. मात्र, त्यानंतरही हे खड्डे भरले न गेल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे.
रत्नागिरी : रेलिंग नसल्यानेच गाडी नदीपात्रात, रेलिंग बसवा, संगमेश्वर तालुक्यातून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:11 PM
इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून तिघांना जलसमाधी मिळाली. हा दुर्दैवी अपघात काल (बुधवारी) दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झाला. दरम्यान, धामणी येथे याठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी रेलिंग नसल्यानेच गाडी नदीपात्रात गेल्याची चर्चा होत आहे.
ठळक मुद्दे रेलिंग नसल्यानेच गाडी नदीपात्रात कोसळलीधोकादायक ठिकाणी रस्ते सुरक्षा विभाग व बांधकाम विभागाने लोखंडी रेलिंग बसवा