शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:45 PM

देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायत निवडणुकआरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

सचिन मोहितेदेवरुख : देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा देवरूख नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.निवडणूक म्हटलं की, प्रचाराची राळ उठविली जाते. यापूर्वी सत्तेत मित्र असलेला आणि राजकीय प्रतिस्पर्धी झाल्यावर आरोप करताना निवडणुकीत मागे-पुढे पाहिलं जात नाही. किंबहुना आपली प्रतिमा जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. यासाठी कॉर्नर सभा, जाहीर सभा यांचा अवलंब होतो.

या प्रचार सभांमुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकातील रंगत वाढताना दिसते. यावेळी देवरुखच्या निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेत किमान ५-६ दिवस वाया गेल्यामुळे आणि सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने जाहीर सभा व कॉर्नर सभांवर भर दिसत नाही. डोअर टु डोअर दोन-तीन फेऱ्यांवर उमेदवारांचा भर आहे.दुसरीकडे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादीकडून बोलले जाते. मात्र, काँग्रेसचा वरिष्ठ पातळीवरचा एकही नेता देवरुखात आलेला नाही.

याबरोबरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील सोमवारपर्यंत देवरुखमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे राज्याचे नेते देवरुखात तळ ठोकून आहेत. भाजपसोबत युती करुन असलेली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांचीदेखील काँग्रेससारखीच स्थिती आहे. आरपीआय हा भाजपच्या कमळ चिन्हावर प्रभाग १३ मधून एका जागेवर लढत आहे.गत पाच वर्षांचा विचार करता अडीच वर्षे सेना आणि दुसरी अडीच वर्षे भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ताधारी म्हणून काम पाहिले. परंतु सध्या अडीच वर्षे सत्ताधारी म्हणून राहिलेल्या भाजपला म्हणावे तसे काम करता आले नसल्याचाच नगारा सेनेकडून बडविला जात आहे.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटले की, सत्ताधारी माझ्यापर्यंत प्रस्तावच घेऊन आले नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही आपल्याला निधी देता आला नाही सांगितले. तर खासदार विनायक राऊत यांनी थापा मारणाऱ्यांचीच आणि दलाली करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी बोचरी टीका भाजपवर केली. आघाडीकडून उमेश शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक