रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.दिल्ली येथून गुरुवारी या स्वच्छ भारत सर्वेक्षणातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्बन अफेअर्स अँड हाऊसिंग मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या दिल्लीतून ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पाच राज्यात सर्वप्रथम आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख नागरी संख्येच्या गटात स्थान देण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२ शहरांची निवड करण्यात आली. रत्नागिरी शहराने सलग तिसऱ्या वर्षी यात स्थान प्राप्त केले आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणी संकलन करुन त्याचे एकत्र गोळा झाल्यानंतर केलेले वर्गीकरण, शहरात १०० टक्के कचरा संकलन, कचऱ्यातून खतनिर्मिती, प्लास्टिकवर प्रक्रिया तसेच घातक कचऱ्यावर प्रक्रिया आदी प्रकल्प उभे केले आहेत. शहराने ओडीएफ ++ मानांकन मिळविले असून, कचरा मुक्तिबाबत शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.शहराचे प्रथम नागरिक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिक, पदाधिकारी, शाळा, संस्था, एनजीओ तसेच विविध माध्यमांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले. कचरा संकलनात रत्नागिरी नगर परिषदेचे काम विशेष कौतुकास्पद झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:30 PM
केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम, देशात दहावा क्रमांक सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी नगर परिषदेची उत्तम कामगिरी